राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत

रत्नागिरी: वैयक्तिक कामधंदासाठी आणि पदासाठी राजन साळवी यांची पक्षप्रवेशासाठी धडपड सुरू आहे. त्यांच्यासोबत आता कोणीही शिल्लक राहिलेले नाही. किंबहुना राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत, हे  मी यापूर्वी ही सांगितले होते. पण राजन साळवी यांना एकनाथ शिंदे पटकन पक्षात घेतील, असं मला वाटत नाही. विधानपरिषद आणि महामंडळ देतील असं देखील मला तरी वाटत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे थोरले बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी दिली आहे.

राजन साळवी यांचा पक्षप्रवेश ही निव्वळ अफवा-किरण सामंत

दरम्यान,  राजन साळवी यांचा पक्षप्रवेश ही अफवा असल्याचे ही किरण सामंत (Kiran Samant) म्हणाले.  किंबहुना असे काही असल्यास याबाबत निर्णय घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला किंवा उदय सामंत यांना विश्वासात घेतील, असेही ते म्हणाले. मात्र अद्याप याबाबत त्यांची आणि आमची कोणतीही चर्चा झालेली नसल्याची स्पष्टोक्ती ही आमदार किरण सामंत (Kiran Samant) यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त आहेत, ते योग्य वेळ योग्य निर्णय घेतील- किरण सामंत

राजेश बेंडल सारखे उमेदवार आमच्या पक्षात आहेत. ते खूप थोड्या मतांनी गुहागरमधून पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना ताकद दिल्यास त्याचा फायदा होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त आहेत. ते योग्य वेळ योग्य निर्णय घेतील याची मला पूर्ण कल्पना  असल्याचे ही किरण सामंत म्हणाले. निवडणूक हरल्यापासून राजन साळवी यांच्याबाबतीत पक्षांतराच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. इतर पक्षातील त्यांची दारं बंद झाल्यामुळे ते अफवा उठवत असतील, अशी शंका ही किरण सामंत यांनी उपस्थित केली आहे.

राजन साळवी आमचे सहकारी – संजय राऊत

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, राजन साळवी संदर्भात मी कस काय त्यावर बोलू शकेल? आता राजन साळवी आमच्या सोबत आहेत. या क्षणापर्यंत ते आमच्यासोबत आहेत. ते निष्ठेची माहिती देत सांगत आहेत. राजन साळवी आमचे सहकारी आहेत. बाकी आम्ही 10 तारखेला आम्ही. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

प्रवेशबाबतीत एकनाथ शिंदे यांना अधिक माहिती असेल- उदय सामंत

दुसरीकडे याच मुद्यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना विचारले असता ते म्हणाले की, राजन साळवी यांच्या प्रवेशबाबतीत मला माहिती नाही. एकनाथ शिंदे आणि माझ्यात त्याबाबत चर्चा नाही. त्यांना कदाचित त्यांच्या प्रवेशबाबतीत माहिती असेल, असेही सामंत म्हणाले.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.