सोने दरात तेजी सुरुच, 1400 रुपयांनी सोनं महागलं, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
ईशान देशमुख, मुंबई : सोने दरात जोरदार तेजी सुरु आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ ट्रेडचं धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततता, आरबीआय आणि रिटेल खरेदीदारांकडून सोने खरेदी वाढल्यानं दर सातत्यानं वाढत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 89500 रुपये आहे, अशी माहिती कुमार जैन यांनी दिली.
24 कॅरेट सोन्याचा दर काल 88100 रुपये होता. आज सोन्याचा दर बाजार सुरु झाला तेव्हा 89500 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत सोन्याचा दर 1400 रुपयांनी वाढला. चलन कमजोर झाल्यानं बाजारातील घडामोडी वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं सोन्याचे दर वाढले आहेत. सोनं लवकरच एक लाख रुपयांपर्यंत जाईल, असं कुमार जैन म्हणाले.
भारतात लग्नसराई सुरु असल्यानं खरेदी करत आहे. अमेरिकनं टॅरिफ सुरु केल्यानं सोन्याचा दर वाढणार आहे. लोकं सोन्याची नाणी आणि दागिणे घेत आहेत. या वर्षात सोन्याचा दर 1 लाखांच्या जवळ जाईल, असं कुमार जैन यांनी म्हटलं.
शुद्ध सोनं घेण्याचा प्रयत्न असल्याचं सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सांगितलं. दिवाळीपर्यंत सोनं 1 लाखांपर्यंत जाईल असा अंदाज आहे, असं सोने खरेदीदारानं म्हटलं. भविष्यातील आर्थिक गरजा भागण्यासाठी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असल्याचं गुंतवणूकदारांनी म्हटलं.लग्न असल्यानं देखील काही जणांनी सोनं खरेदी करत असल्याचं सांगितलं.
सोने दर वाढण्याची कारणं?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. त्यांनी आयात शुल्क वाढवण्याचे निर्णय घेतल्यानं सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत. गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडं पाहिलं जातंय. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असून बाजार उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे सोने अधिकाधिक महाग होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक धोरणं,जागतिक बाजारातील अस्थिरता, विदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री यामुळं शेअर बाजारात आलेली घसरण पाहता गुंतवणूक जोखीम पत्कारण्याऐवजी सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत.
लग्नसराईमुळं सोन्याची मागणी कायम राहणार
याशिवाय, सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष सोन्याच्या किमतींवर आहे. आता पुढील काही महिन्यांत हे दर आणखी वाढतील की स्थिर होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
https://www.youtube.com/watch?v=di4rg8vzz5i
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.