चक्क पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढण्याचा प्रकार? व्हीडिओ व्हायरल

पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे विद्यापीठात (Pune University) चक्क पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये पाय टाकून एक व्यक्ति पाणी बाहेर काढत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅन्टीनमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगितलं जातंय. मात्र एकीकडे पुण्यात जीबीएस (GBS) रुग्णांची संख्या वाढत चालली असताना असा किळसवाणा व्हिडिओ आला समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे हा प्रकार म्हणजे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय का? असा सवाल ही या निमित्याने विचारला जातोय. त्यामुळे या प्रकरणी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रशासन नेमकी काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये चक्क पाय?

व्हायरल व्हीडिओमध्ये विद्यापीठातील आदर्श कॅन्टीनमध्ये एक कर्मचारी  पिण्याच्या पाण्याच्या कुलरमध्ये चक्क पाय टाकून पाणी बाहेर काढतो आहे, असा व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये असलेल्या कॅन्टीन , मेस व उपहारगृहात जेवणामध्ये अळी, झुरळे इत्यादि निघण्याच्या घटना कायम घडत असल्याचा आरोप ही विद्यार्थ्यांनी केला आहे. तर पुण्यात जीबीएस (GBS) रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली असताना असा किळसवाणा व्हिडिओ आता समोर आल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. अशातच काल (10 फेब्रुवारी) विद्यापीठातील वसतीगृहात विद्यार्थ्यांना उंदीर चावलायची घटना ताजी असताना विद्यापीठातून आणखी एक प्रकार पुढे आला आहे.

विद्यार्थिनींनी पिझ्झा खाल्ला म्हणून वसतिगृहातून काढून टाकलं?

पुण्यातील हवेली तालुक्यातील मोशी येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील 4 विद्यार्थीनींनी पिझ्झा खाल्ला म्हणून त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला होता. मात्र हे वृत्त चुकीचे असून, वसतिगृहाच्या गृहप्रमुखान मार्फत प्रशासकीय बाब म्हणून संबंधित विद्यार्थीनींना फक्त समज देण्यात आली होती. प्रत्यक्षात कोणत्याही विद्यार्थीनींना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेले नाही, ही वस्तू स्थिती आहे. वसतिगृहातून विद्यार्थिनींना काढून टाकल्याचे वृत्त चुकीचे आहे. अशी स्पष्टोक्ती समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.