तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पोलिसांचा यक्षप्रश्न
पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने सोमवारी एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हा मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले होते. ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेला होता. मात्र, त्याचे अपहरण झाल्याची माहिती पसरताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अंदमान-निकोबारपर्यंत गेलेले ऋषिराज सावंत यांचे विमान माघारी वळवण्यात आले. हे चार्टर्ड प्लेन रात्री साडेदहाच्या सुमारास लोहगाव विमानतळावर उतरले. त्यानंतर पुणे पोलिसांनी विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब नोंदवून घेतला.
ऋषिराज सावंत खरंच घरी न सांगता बँकॉकच्या दिशेने निघाले होते का? तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं का?, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिसांनी आता याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. त्यामध्ये ऋषिराज सावंत यांनी बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचे 68 लाख रुपये ऑनलाईन भरल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंत बँकॉकला रवाना झाल्यानंतर पुणे पोलिसांना त्यांचे अपहरण झाल्याचा निनावी फोन आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तानाजी सावंत आपल्या मोठ्या मुलासह पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. नेमक्या कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली, याचा तपाससुद्धा पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
तानाजी सावंत यांचा मुलगा कात्रज येथील कार्यालयातून संध्याकाळी पाचच्या सुमारास एका कारने दोन मित्रांसमवेत लोहगाव विमानतळावर गेले. त्यांना तिथे सोडून चालक कात्रजच्या कार्यालयात परतला. त्याने याबाबत तानाजी सावंतांना माहिती दिली. ऋषिराज कोणालाही न सांगता विमानतळावर गेल्याचे समजताच तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंबीय धास्तावले. तानाजी सावंतांनी याबाबत तातडीने पुणे पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तातडीने नाकाबंदी केली. लोहगाव विमानतळासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान पोलिसांकडून रस्त्यावरील वाहनांचीही तपासणी सुरु होती.
पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळावरुन रवाना झालेल्या प्रवाशांच्या याद्या तपासल्या. तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यावेळी ऋषिराज सावंत आपल्या मित्रांसह चार्टर्ड प्लेनमध्ये बसून बँकॉकला रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात आता पोलीस ऋषिराज सावंतची पुन्हा चौकशी करणार का? या चौकशीतून काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=E1-tcnneuxm
आणखी वाचा
Days दिवस लांब दुबईवारी, आता million 68 दशलक्ष बिलांपेक्षा दशलक्ष, पीपी रागावती
अधिक पाहा..
Comments are closed.