तुरुंगातून सुटला, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार; पोलिसांनी गावातून धिंड काढत फिरवलं
नागपूर क्राइम न्यूज: कारागृहातून सुटून आल्यानंतर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार (Nagpur Crime) करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहे. शिवाय अटकेनंतर या सराईत गुन्हेगाराला पायी नेत नागपूर पोलिसांनी एकप्रकारे धिंड काढली आहे.
रोशन शेख अस या आरोपीच नाव असून तो कुख्यात गुंड असल्याची माहिती ही पुढे आले आहे. त्यावर बलात्कार,अपहरण, खंडणीचे अनेक गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहे. मागील वर्षी गुन्ह्यात तुरुंगातून सुटून तो बाहेर आला होता. मात्र काही माहिन्यांपूर्वी तो करागृहातून बाहेर आला. दरम्यान करागृहातून सुटताच त्याचे आणखी एक प्रकरण पोलिसांकडे पोहोचले. त्याने सहा महिन्यांपूर्वी एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत, बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली.
अश्लील क्लिप तयार करत सतत ब्लॅकमेल
मिळालेलया माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी रोशनने लग्नाचं आमिष देत एका तरुनीशी शारीरिक सबंध ठेवत तिची अश्लील क्लिप तयार केली होती. त्याच्या आधारावर तो तिला सतत ब्लॅकमेलही करत होता. दरम्यान, पिडीतीने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे पीडित तरुणीला रोशन ने मारहाण केली. शिवाय एवढ्यावर न थांबता रोशन ने तिची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल ही केली. या विरोधात पीडितेने सदर पोलिसात तक्रार दिली असता सदर पोलिसांनीही सराईत गुन्हेगार असलेल्या रोशन शेखला एका तासात अटक केली.
तासाभरात बेड्या ठोकत दहशत असलेल्या परिसरात काढली धिंड
सोबतच रोशन शेखला फ्रेंड्स कॉलनी परिसरात राहत्या फ्लॅट स्कीमपर्यंत पायदळ चालवत नेले. वाहन खराब झाल्याच कारण देत पायदळ नेल्याच पोलीस सांगत असले, तरी ही एक प्रकारची रोशनची दादागिरी असेलल्या फ्रेंड्स कॉलनीत धिंड काढून त्याची दहशत कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. अशातच गुंडगिरीचा माज उतरवण्याचा पोलिसाचा या अनोख्या पद्धतीचे नागरिकांकडून कौतुकही होत आहे.
दोन ऑटोच्या अपघात विध्यर्थाचा मृत्यू
दोन ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना पुसद शहरातील साई मंदिर रोडवर घडली. सौरव भिका राठोड (13) रा. दहिवडी असे या विध्यार्यांचे नाव आहे. पुसद येथील श्रीराम असेगावकर विद्यालयात इयत्ता 7 मध्ये शिकत होता. आज इतर विद्यार्थ्यांसोबत ऑटोमध्ये बसून पुसदला येत असताना समोरून येत असलेल्या आटोची धडक दिली. या अपघातात दोन्ही ऑटोतील विद्यार्थी प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. मात्र या अपघातात सौरव हा जागीच ठार झाला आहे. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय नेले असता मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.