‘लाडकी बहीण’चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
लाडकी बहिन योजना: लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणार अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालेलेच नाही. एकट्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात शेतकऱ्यांची (Farmers) शासनाकडे पाच कोटी 60 लाख रुपये सरकारकडे बाकी आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान मिळते, म्हणून या योजनेत सहभाग घेतला होता. शेतीत ठिबक योजनेसाठी स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांनी पैसे घातले. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे मागण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांना त्यांच्या हक्काचे सबसिडीचे पैसे मिळत नसल्याची स्थिती उद्भवली आहे.
लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका बसत असल्याने विरोधकांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन सारख्या योजना बंद करायला लागल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. तर लाडकी बहीण योजना बहिणींसाठी नाही तर सत्तेसाठी होती, असे म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांच्या नावाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने : जयंत पाटील
जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, लाडकी बहीण योजनेतून 5 लाखाच्या आसपास महिलांची नावे कमी झाली आहेत. महिलांना एकदा पैसे दिले की दिले. त्या पैशावर महिलांनी मते देखील दिले. पण आता काही महिलांना या योजनेतून वगळत आहे हे सरकार चुकीचं करतेय. पैसे देताना सरकारने बघूनच पैसे द्यायला हवे होते. पैसे न बघता दिल्यावर आता पैसे थांबवता येणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिनींना मिळणारे पैसे मिळालेच पाहिजे. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने उभे आहोत. ज्या महिलांनी मतदान केलं त्या महिलांची आता फसवणूक झाली असं त्या महिलांना वाटू नये, असे म्हणत जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला टोला लगावलाय.
https://www.youtube.com/watch?v=ephmpiyritk
लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करू नका
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने लाडका भाऊ योजनेच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत लाखाहून जास्त प्रशिक्षणार्थी राज्यातील विविध कार्यालयात नेमले होते. आता त्यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कामावरून कमी केले जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थींवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन करण्यासाठी आज सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तरुणांचा राज्यव्यापी मेळावा पार पडतोय. या प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा या मागणीसाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सांगलीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेय. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हभप तुकाराम बाबा महाराज यांनी या मेळाव्यात पुढाकार घेतलाय.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.