नाशिकमध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्ला

नाशिक गुन्हा: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता पंचवटीच्या  (Panchavati) पेठ रोड (Peth Road) परिसरात भरवस्तीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या इसमाच्या डोक्यावर जबर मार लागला असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटीच्या पेठरोड परिसरात आज बुधवारी (दि. 12) सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. अत्यंत वर्दळीच्या परिसरात मृतदेह आधळल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

इसमाच्या डोक्यावर जबर मार लागला असून दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.  घटनास्थळी पंचवटी पोलीस पथकासह श्वान, फॉरेन्सिकचे पथक तपासणी करत आहेत. हा इसम मजूर असल्याची माहिती समोर येत असून मृतदेहाजवळ दारूची बाटली आणि ग्लास आढळली आहे. मात्र, या इसमाची हत्या नेमकी का झाली? याचे कारण अजून अस्पष्ट आहे.

गंगापूर रोडवर धिंगाणा घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल जवळ एक क्लब मधून नाईट पार्टी करून मध्याच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली. तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून युवक आणि युवतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=andwnrful8u

इतर महत्त्वाच्या बातम्या

बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्…; वसई हादरली!

Nashik City Link Bus : सिटीलिंक बस खड्यात आदळली, प्रवासी सीटवरून उडाला अन् पोटाला जबर मार, रुग्णालयात उपचारादरम्यान सोडला जीव

अधिक पाहा..

Comments are closed.