शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना…

शरद पवार वर सुषमा आणि नवी दिल्लीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते काल (11 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (मराठी) महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यावर शिवसेना ठाकरे गटाचा अक्षरशः तीळपापड झाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्कारावर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केलीय. कट्टर विरोधक असलेल्या शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय.

शिवसेना पक्षफुटीला कारणीभूत ठरलेल्या एकनाथ शिंदेंचा सत्कार पवारांनी केल्यावर उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज असल्याचं समजतंय. महाविकास आघाडीत या निमित्ताने मोठं वादळ निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. शरद पवारांनी केलेल्या सत्कारानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पाठराखण करताना दिसतायत तर उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते शरद पवारांच्या कृतीवर जोरदार टीका करत आहेत. आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare On Sharad Pawar) यांनी देखील एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

टिळक पुरस्कारासाठी मोदी पुण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय लोक मोदींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. Modi Go Backचे नारे देत या विरोध प्रदर्शनामध्ये NCP(SP) सुध्धा सहभागी होती. पण त्याच पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती होती. मुळात पुरस्कार देण्याघेण्याचं गणित अत्यंत सोपं आहे. जे व्यवस्थेची भलावण करतात त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांचा संजय राऊतांवर निशाणा-

दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही. तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=W-hgnhd8n6s

संबंधित बातमी:

Sanjay Raut On Sharad Pawar: संजय राऊत शरद पवारांवर पहिल्यांदाच कडाडले; म्हणाले, दिल्लीत राजकीय दलाल…

अधिक पाहा..

Comments are closed.