धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
पुणे : जिल्ह्यातील नावाजलेली एमआयडीसी असलेल्या चाकण एमआयडीसी (एमआयडीसी) परिसरात दिवसाढवळ्या एका उद्योजकावर गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली होती. 20 जानेवारी रोजी येथील स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आता, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानेच, ज्याला अजयसिंह आदर्श मानत होता त्या संग्रामसिंगनेच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून पुढे आलं आहे. विशेष म्हणजे 12 लाख रुपयांत भावाला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) 4 जणांना अटक केली असून नुकतेच एकास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरच, भावानेच सुपारी दिल्याचं गुढ उघडकीस आली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत 20 दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली होती. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन् त्यांनी कंपनीच्या गेटवरुनच कंपनीच्या मालकांवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते. आता, याप्रकरणी पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या मुळाशी पोहोचले असून उद्योजक अजय सिंग यांच्या चुलत भावानेच भावाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं, कसं उलगडलं गुढ?
जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये झालेल्या गोळीबाराने वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर पोलीस तपासातून पुढे आली आहे. कौटुंबिक वाद आणि व्यावसायीक ईर्षेतून त्याने ही सुपारी दिली होती. संग्रामसिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव असून त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता, अजय त्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केल्यावर आता नवी माहिती समोर आली आहे. याप्रकरणात चक्क चुलत भावाचे बिंग फुटले. अजय आधी संग्रामकडे कामाला होता, अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेचं आणलं होतं. मात्र, अजय मोठा होऊ लागला, हे संग्रामला पचत नव्हतं. त्यातून संग्रामने अजयची सुपारी दिली अन् सगळा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस काय-काय तपास करतायेत, याचीही माहिती तो घेत असे. मात्र, अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचं उघडकीस झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसेना. मी ज्याला आदर्श मानत होतो, तोच माझ्या जीवावर उठला. हे उघडकीस आल्यावर अजयला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.