सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश ज्योतीराम पाडुळे असे आत्महत्या (Suicide news) करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश पाडुळे (Mahesh Padule) यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, महेश पाडुळे यांनी वैराग येथे राहत्या घरी गळफास घेऊन केली. ड्युटी संपवून घरी आल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समजत आहे. ते मुळचे माढा तालुक्यातील अंजनगावचे रहिवासी होते. ते सोलापूर ग्रामीण मुख्यालयात (Solapur Gramin) कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती. त्यामुळे ते कुटुंबीयांसोबत वैराग येथे राहायला गेले होते. मात्र, त्यांनी गळफास घेऊन अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून त्यांच्या आत्महत्येचा कारणाचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी महेश पाडुळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली? ते तणावात होते का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेचा अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत.
साताऱ्यात तरुणाची तलवारीचे वार करुन हत्या
साताऱ्यातील शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून एका 22 वर्षीय युवकाची तलवारीने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे. अमर कोंढाळकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस निगडे या 19 वर्षीय युवकाने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तात्काळ अमर कोंढाळकर यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचाराधीस्ताचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली याप्रकरणी संशयित आरोपीवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=gkypem2q2Sg
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.