शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांध
आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली: दिल्लीत मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र, या पुरस्कार सोहळ्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. या पुरस्कारावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली. दरम्यान, शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीने मोठं पाऊल टाकलं आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी हे काल बुधवारी (दि. 13) अचानक दिल्लीला रवाना झाले. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गुपचूप भेट घेतल्याची माहिती आता समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आदित्य ठाकरे हे काल एका लग्न सोहळ्यासाठी दिल्लीत आले होते. आज ते दिल्लीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांना भेटायला गेले होते. या दोघांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणूक, त्यासोबतच महाराष्ट्र आणि केंद्रीय राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, दोघांच्या भेटीचा फोटो देखील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीने राजकीय अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आदित्य ठाकरे केजरीवालांची भेट घेणार
दरम्यान, आदित्य ठाकरे हे सकाळी 11 अकरा वाजता अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरे अरविंद केजरीवाल यांना भेटायला जाणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि इंडिया आघाडी संदर्भात अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आदित्य ठाकरे चर्चा करणार आहेत.
आदित्य ठाकरे शरद पवारांची भेट घेणार?
दुसरीकडे शरद पवार हे देखील दिल्लीत आहेत. शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक देखील केलं आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे हे शरद पवारांची दिल्लीत भेट घेणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=DTWHJFMC22E
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.