14 फेब्रुवारीपासून रंगणार WPL 2025 हंगामाचा थरार! जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता सामने, A टू Z

जीजी वि आरसीबी डब्ल्यूपीएल 2025 थेट प्रवाह: पहिले दोन हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचा थरार येत्या 14 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. ज्यामध्ये यावेळी देशातील चार शहरांमध्ये स्पर्धेचे सामने खेळवले जातील. WPL मध्ये एकूण 5 संघ सहभागी होतात, ज्यामध्ये पहिल्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने या स्पर्धेचा ट्रॉफी जिंकला होता. तर दुसऱ्या म्हणजेच गेल्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले होते. यावेळी, WPL 2025 चा पहिला सामना 14 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना 15 मार्च रोजी खेळला जाईल.

चार शहरांमध्ये रंगणार थरार WPL 2025चा!

वूमन्स प्रीमियर लीगचे सामने देशातील चार शहरांमध्ये खेळवले जातील, हे पहिल्यांदाच घडणार आहे. ही स्पर्धा वडोदरा येथून सुरू होईल, त्यानंतर हा कारवां बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचेल, तर यावेळी वूमन्स प्रीमियर लीग सामने लखनऊमधील एकाना स्टेडियमवरही खेळवले जातील. अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल.

वूमन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ खेळतात, ज्यात गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. लीग टप्प्यात, सर्व संघांना एकमेकांविरुद्ध किमान 2 सामने खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर एलिमिनेटर सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळला जाईल.

WPL 2025 सामन्यांचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहायचे…

चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर वूमन्स प्रीमियर लीग 2025 हंगामाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर असेल. चाहते डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपमध्ये लॉग इन करून त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर वूमन्स प्रीमियर लीग सामने देखील पाहू शकतात. यावेळी वूमन्स प्रीमियर लीग 2025 मधील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील आणि टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.

2025 वूमन्स प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक –

14 फेब्रुवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 7.30 वाजता, वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
15 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजता, वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
16 फेब्रुवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी 7.30 वाजता, वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
17 फेब्रुवारी – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 7.30 वाजता, वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
18 फेब्रुवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7.30 वाजता, वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
19 फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजता, वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
21 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
22 फेब्रुवारी – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी 7.30 वाजता ७.३० वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
24  फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
25 फेब्रुवारी – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
26 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
27 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
28 फेब्रुवारी – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
1 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
3 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ – एकाना क्रिकेट स्टेडियम
6 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ – एकाना क्रिकेट स्टेडियम
7 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7.30 वाजता, लखनौ – एकाना क्रिकेट स्टेडियम
8 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ – एकाना क्रिकेट स्टेडियम
10 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, 7.30 वाजता, मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियम
11 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 7.30 वाजता, मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियम
13 मार्च – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियम
15 मार्च – अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियम

अधिक पाहा..

Comments are closed.