… तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला

आदित्य ठाकरे वर प्रवीण दरेकर: शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) अनुषंगाने दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार गुपचूप शिंदे गटाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला (Dinner) उपस्थिती लावत असल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्यावरुन बोलता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी खासदारांना सक्त सूचना दिल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. याच मुद्यावरुन भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. आदित्य ठाकरेंनी दमाने घ्यावं. परवानग्या घेत बसले तर एक माणूसही राहणार नाही असे दरेकर म्हणाले.

नेमकं काय म्हणाले प्रविण दरेकर?

अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती प्रविण दरेकरांनी दिली. याचं अंतिम रुपांतर पक्ष प्रवेशात होईल असेही ते म्हणाले. जेवायला परवानगी काय घ्यावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आदित्य ठाकरे गेले होते. त्यांनी परवानगी घेतली होती का? असा सवाल यावेळी प्रविण दरेकरांनी केला. परवानग्या घेत बसले तर एक माणूसही राहणार नाही. त्यामुळं आदित्य ठाकरेंनी जरा दमाने घ्यावं असा सल्ला दरेकरांनी दिला.

उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांची तळी उचलत आहेत

उद्धव ठाकरेंना रोज धक्के बसत आहेत, एकनाथ शिंदेंनी धक्का दिल्यानंतर सावरणं अपेक्षित होतं. मात्र, ते सध्या काँग्रेस आणि शरद पवार यांची तळी उचलत आहेत असा टोला दरेकरांनी लगावला. कट्टर कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेऊ शकतात असेही दरेकर म्हणाले. सोबतच, भाजपकडे देखील काहीजण येत आहेत, भविष्यातही येतील असे दरेकर म्हणाले.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे हे गुरुवारी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सक्त सूचना दिल्या. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, असे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेमुळे शिवसेनेचे खासदार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवे, असे सांगत ठाकरे गटाच्या संबंधित खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंच्या सूचनेने ठाकरेंचे खासदार नाराज!

अधिक पाहा..

Comments are closed.