जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चा

मराठी : शिवसेना (Shivsena) वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जे जे पक्षात येत आहेत, त्यांचं स्वागत आम्ही करत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (एकनाथ शिंदे) यांनी केलं. जे राहिले ते पण येतील असा असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. आज राजापुरचे माजी आमदार राजन साळवी ( Rajan Salvi) यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला, त्यानंतर एकनाथ शिंदे बोलत होते.

शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवणे हे दुर्दैव

ठाकरे गटानं शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतित्युत्तर दिलं. शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवणे हे दुर्दैव आहे. पवारसाहेब परिपक्व नेतृत्व आहे. एक पुरस्कार दिला तर एवढा जळपापड व्हायचं कारण काय? असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. राजकारणात मोठं मन हवं, कमरेखाली वार कधी केले नाहीत. कोणाबद्दल वाईट कधी बोललो नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले. आशा भोसले यांचा मन मोठं आहे. त्या ठाण्यात आल्या माझ्याबद्दल चांगलं बोलल्या. त्यामुळं त्यांची (ठाकरे गट) पोट दुःखी होते का? आशा भोसलेवर नाराजी व्यक्त केली. तर त्यांना काय होणार? त्यांचं काय जाणार? असे म्हणते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

शरद पवार यांनी राजकारणापलीकडे काम केलं

शरद पवार साहेब यांनी ज्यांना मुख्यमंत्री केलं त्यांचा अपमान केला. शरद पवार यांनी राजकारणापलीकडे काम केलं आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. पवार साहेब यांनी राज्याची संस्कृती दाखवली तर या माणसांनी विकृती दाखवली असे म्हणत ठाकरे गटावर शिंदे यांनी टीका केली.  ही त्यांची खेकडा वृत्ती आहे ही पोटदुखी आहे. हे कंपाउंडर कडून औषध घेतात, पोटदुखी थांबण्यासाठी चांगल्या डॉक्टरकडून औषध घ्या असा टोला शिंदे यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंना लगावला. घरात बसून काम होत नाही, हे शरद पवार यांनी सुद्धा आपल्या पुस्तकात लिहिलं आहे त्यांच्याबद्दल. शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे की आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं? आणि मी काय काम केलं असेही एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्या खासदारवर अविश्वास दाखवताय, माझ्यावर अविश्वास दाखवाला माझं सुद्धा खच्चीकरण केलं असेही शिंदे म्हणाले.

आदित्य ठाकरेंनांही लगावला टोला

दिल्ली समोर गुडघे टेकणार नाही म्हणायचे आता काय दिल्लीत करताय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. पुरस्कार मला दिल्यामुळं त्यांचा तिरस्कार करायला लागलेत. लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे असेही शिंदे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=9i7spdjs0uy

महत्वाच्या बातम्या:

एकानथ झिंडे: डेर ए ड्युरुस्टा एए … राजन साल्वी आजोबा सामील झाले; इनाथ शिंडे काय केले?

अधिक पाहा..

Comments are closed.