राऊत प्रयागराजला गेले तर गंगा घाण होईल, त्यांना नारळाच्या झाडाखालीच बसवा, शहाजीबापूंची फटकेबाजी
संजय राऊतवरील शाहजी बापू पाटील: संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिवसेनेच्या हिंदुत्वाची माती केली आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसवण्यास उद्धव साहेबांना भाग पाडल्याचे पाडल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी व्यक्त केले. संजय राऊतांना प्रयागराजला जाऊ देऊ नका, अन्यथा तो गंगा घाण होईल असा टोलाही पाटील यांनी लगावला. त्यांना त्या नारळाच्या झाडाखालीच बसू द्या असेही पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंना त्यांची वर्तणूकच धक्का देत आहे
उद्धव ठाकरे यांना कोणीही धक्का दिलेला नसून त्यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आहे असे शहाजीबापू पाटील म्हणाले. अजूनही त्यांनी विचार करावा आणि खऱ्या शिवसेनेत यावे असे निमंत्रण शहाजी बापू पाटील यांनी दिले. निलम गोऱ्हे या अनेक वर्ष शिवसेनेत राहिल्या असून त्यांना तिथली कार्यपद्धती चांगली माहित आहे. त्यामुळं त्यांनी केलेल्या आरोपात नक्कीच तथ्य आहे. शिवसेनेत तिकीट कशी दिली जायची? हे सर्व जगाला माहित आहे. मला तिकीट देताना काही मागायचे धाडस यांच्यात नव्हते. त्यामुळे मला कोणी याबाबत बोलले नसावे असा खुलासा शहाजी बापू पाटील यांनी करताना निलम गोऱ्हे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आणकी आत्मचिंतन करावे, त्यांनी शिवसेनेत यावे अशे शहाजीबापू पाटील म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
आता मी धक्का पुरुष झालो आहे, असे कोण किती धक्के देतंय ते बघुयात. यांना काय धक्के द्यायचे ते आता देऊद्यात. पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत. जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जात, तसं आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं. कोण किती धक्के देतंय ते बघू, पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. एकादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच, सैनिक म्हंटल्यावर शिस्त असली पाहिजे. ही लढाई एकट्या-दुकट्याची नाही तर ही लढाई आपली आहे. आपल्या मुळावर घाव घालण्यासाठी ते सरसावले आहेत. आपल्याच लाकडाचा दांडा करून कुदळ करून शिवसेना आणि मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता आपण एकत्र राहिलं पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
https://www.youtube.com/watch?v=bya0vqbxr3y
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Raut : शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स, कधीही कापला जाईल; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा खोचक टोला
अधिक पाहा..
Comments are closed.