नीलम गोऱ्हे विश्वासघातकी बाई, जाताना ताटात घाण करुन गेली; संजय राऊतांच्या तोंडातून अग्नीबाण बरस

मुंबई: उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षातील पदांचे वाटप करण्यासाठी संबधितांकडून मर्सिडीज गाडी घेतात, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याल नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याविरोधात ठाकरे गट पेटून उठला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्यावर आगपाखड केली. नीलम गोऱ्हे यांना मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलवण्यात आले होते. साहित्यक म्हणून त्यांचे काय योगदान आहे?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविषयी बोलताना ‘नीच’, ‘नमकहराम’, अशा विशेषणांचा वापर केला होता. यावरुन निर्माण झालेल्या वादंगाबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्यावर एक काय 10 हक्कभंग आणा. नीलम गोऱ्हे महिला असल्या म्हणून काय झालं? मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीविषयी बोलत आहे. त्या उपसभापती म्हणून उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलल्या होत्या का? नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेवर पाठवण्यासारखं त्यांचं काय कर्तृत्व होतं? या विश्वासघातकी बाईला उद्धव ठाकरे यांनी काय कमी केलं? त्यांच्या काही कारणांमुळे त्या शिंदे गटात गेल्या असतील, पण उद्धव ठाकरे यांच्यावर असले आरोप करण्याची काय गरज होती, असे संजय राऊत यांनी म्हटले.

निलम गोऱ्हे यांचं विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? नीलम गोऱ्हे म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या कामाच्या जोरावर मला आमदारकी दिली. पण बाळासाहेब ठाकरे यांना असले लोक पसंत नव्हते. तुम्हाला बाळासाहेब यांनी आमदार केलं नाही.  अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब ठाकरे आमदार करत नव्हते. त्या चारवेळा आमदार झाल्या. पण जाताना ही बाई ताटात घाण करून गेली, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

नीलम गोऱ्हे सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात: संजय राऊत

नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी उषा तांबेला साहित्य संमेलनात माझा कार्यक्रम लावण्यासाठी 50 लाख रुपये दिले. मग त्या मर्सिडीजही देऊ शकतात. नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारायला देण्यासाठी किती पैसे घेतात, याची माहिती माझ्याकडे आहे. या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=_n6o_neqzxm

आणखी वाचा

ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद; नीलम गोऱ्हेंचा आरोप, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

अधिक पाहा..

Comments are closed.