Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप
नीलम गोर्हे वर विनायक पांडे: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे, असे त्यांनी म्हटले. तर, नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना (Vinayak Pande) उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय.
विनायक पांडे म्हणाले की, 2014 ची विधानसभा निवडणूक लागली, मी आणि अजय बोरस्ते दोघे ही इच्छुक होतो. नीलम गोऱ्हे यांचा भैय्या बहाते कार्यकर्ते होता. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले. तेव्हा मी हो सांगितले. नीलम ताईंना काही रक्कम दिली. त्यानंतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले. मी त्यांना सांगितले मला पैसे द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.
Comments are closed.