शाखाप्रमुखांच्या नियुक्त्यांसाठी मिठाईचे बॉक्स…; नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीनंतर आता रामदास कदम
संजय राऊतवरील रामदास कडम: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काल (23 फेब्रुवारी) केला होता. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं होतं. नीलम गोऱ्हेंच्या या विधानावरुन कालपासून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. तसेच निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाईमाणूस असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हेंवर प्रहार केला. संजय राऊतांच्या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठनेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. नीलम गोऱ्हेंना जे सांगायचं ते त्यांनी सांगितलं, की मराठी माणूसच कसा मराठीचा अपमान करतो, असं रामदास कदम म्हणाले. तसेच शाखाप्रमुखांच्या नियुक्त्यांसाठी मिठाईचे बॉक्स द्यावे लागतात हे आम्हाला माहिती आहे, असा गौप्यस्फोटही रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.
संजय राऊत येडं गावला जाऊन पेढं कशाला खात आहात, मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. एका मराठी माणसाला दुसरा मराठी माणूस कसा मागे खेचतो हे नीलम गोऱ्हे यांना सांगायचं होतं. संजय राऊत यांना बोलायची पद्धत राहिली नाही. आपण कोणाला एका उपसभापतींना काय बोलतोय याचं भान नाही. मुघलांंना ज्या प्रकारे संताजी-धनाजी ठिक ठिकाणी दिसायचे तसे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना एकनाथ शिंदे दिसतात. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या राजकारणाला सुरुंग लावल्यने ही जळफळाट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली.
संजय राऊतांना भान असलं पाहिजे- रामदास कदम
नीलम गोऱ्हे यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे काय बोलयाचं…शरद पवारांना संजय राऊत बाप म्हणतात, तुम्ही त्यांच्यावरही टीका करता…संजय राऊतांना भान असलं पाहिजे की ते महिलेबद्दल काय बोलतात…उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून त्यांची पातळी किती खालवली आहेत हेच संजय राऊत दाखवतात, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला. मुघलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायचे तेव्हा त्यांना पाण्यातही संताजी, धनाजी दिसायचे. तसेच उबाठाच्या लोकांना सगळीकडे शिंदेच दिसतात, असा निशाणा देखील रामदास कदम यांनी साधला.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.