कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्
मणक्राव कोकेटे: मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) ठोठावली आहे. शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे हे आज (दि.24) सत्र न्यायालयात धाव घेणार असून ते न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्येने आता या प्रकरणात उडी घेतली आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.
हस्तक्षेप याचिका दाखल करणार : अंजली दिघोळे
तर, दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत. याबाबत अंजली दिघोळे म्हणाल्या की, तुकाराम दिघोळे हे मूळ तक्रारदार होते. आज ते हयात नाहीत, त्यामुळे मी त्यांची मुलगी असल्याने मी हस्तक्षेप अर्ज दाखल करत आहे. सेशन कोर्टात कोकाटे अपील दाखल करत आहेत. त्याला मी हस्तक्षेप घेत आहे. खालच्या कोर्टाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण, मी आता हस्तक्षेप दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=plrfdvdtnh8
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.