15 रुपयांच्या शेअरमुळं गुंतवणूकदार कोट्याधीश, गुंतवणूकदारंना मालामाल करणारा शेअर किती रुपयांवर?
मुंबई : भारतीय शेअर बाजाराला जोरदार धक्के बसत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सातत्यानं सुरु असलेल्या घसरणीमुळं शेअर बाजारातील बीएसईच्या सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांचं बाजारमूल्य 400 लाख कोटींच्या खाली आलं आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून करण्यात येणाऱ्या समभागांच्या विक्रीमुळं शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. एकीकडे हे चित्र असताना एका स्टॉकनं गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. इंडो थाई सिक्युरिटीजच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
इंडो थाई सिक्युरिटीजच्या स्टॉकमध्ये पाच वर्षांपूर्वी ज्यानं 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तो आज मालामाल झाला आहे. 3 एप्रिल 2020 ला या स्टॉकच्या एका शेअरची किंमत 14.70 रुपयेहोती. जी गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा 2035 रुपयांपर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा हा स्टॉक 1993 रुपयांवर होता. या पेनी स्टॉकनं गुंतवणूकदारांना 13457.82 टक्के परतावा दिला आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी इंडो थाई सिक्युरिटीजचे एखाद्यानं 1 लाख रुपयांचे शेअर पाच वर्षांपूर्वी खरेदी केले असते. तर, त्याचं मूल्य आतापर्यंत 1.35 कोटी रुपये झालं असतं. म्हणजेच ज्यानं 14.70 रुपयानं कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर खरेदी केले आणि ते शेअर कायम ठवले. त्याचं मूल्य आता 1.35 कोटी रुपये झालं आहे.
इंडो थाई सिक्युरिटीजची स्थापना 1995 मध्ये झाली होती. ही शेअर ब्रोकर कंपनी आहे. रिअल इस्टेट, ग्रीन टेक्नोलॉजी, आयएफएससी यासह इतर कंपन्यांसाठी सेवा पुपरवण्याचं काम करते. याशिवाय भारतीय इक्विटी मार्केटमध्ये फ्यूचर, ऑप्शन्स आणि करन्सी डेरिवेटिव सेगमेंटमध्ये ट्रेडिंग सेवा देते.
या कंपनीचं बाजारमूल्य 2200 कोटी रुपये आहे. कंपनीनं अनेकदा शेअर धारकांना लाभांश दिला आहे. 21 सप्टेंबर 2021 ला 1 रुपया, 22 सप्टेंबर 2022 ला 1 रुपया, 15 सप्टेंबर 2023 ला 60 पैसे, 13 फेब्रुवारी 2024 ला 1 रुपया आणि 20 सप्टेंबर 2024 ला 60 पैसे लाभांश दिला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 502 टक्क्यांची वाढ झाली असून गेल्या सहा महिन्यात 471.39 टक्के परतावा दिला आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Comments are closed.