मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण, गजा मारणेला कोथरुड पोलिसांकडून अटक

गजा दयनीय: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Union Minister Muralidhar Mohol) यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गजा मारणेला (Gaja Marne) कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) अटक करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती आहेत देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. कोथरुड पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे. गजा मारणे बरोबरच इतर आरोपींचांही कोथरुड पोलिसांकडून शोध सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोथरूड (Kothrud) परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि त्यामुळे ते चौघे मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मारहाण प्रकरणात काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

चौकात जागा न मिळाल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणाने देवेंद्र जोग या व्यक्तीला मारहाण झाली. तो माझ्या कार्यालयात काम करत नाही. तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याला बेदम मारहाण झाली. हे समजल्यानंतर पोलिसांशी बोललो. शेवटी देवेंद्र असो किंवा कोणताही पुणेकर, माझ्या शहरात असे चालू देणार नाही. चूक करणारा कोणीही असला, तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे. यामध्ये सहभागी असणाऱ्यांना वाचवायला कोणी येत असेल, तर त्यांना पोलिसांनी सोडू नये. या प्रकरणी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे मोहोळ म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime : गजा मारणे गँगची कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा पोलिसांना आत्मपरीक्षणाचा सल्ला, म्हणाले, ‘…नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावं लागेल’

अधिक पाहा..

Comments are closed.