खळबळजनक! भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार; सहा आरोपींना 48 तासांत बेड्या

भिवंडी गुन्हेगारीच्या बातम्या: भिवंडी शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर झालेल्या धक्कादायक सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत 48 तासांच्या आत सहा आरोपींना अटक केली आहे. ही घटना बागे फिरदोस परिसरात घडली. जिथे पीडित तरुणीला तिच्या भावासह जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. आरोपींनी पीडितेच्या भावास आणि रिक्षा चालकास मारहाण (Crime News) करून तिला नागाव परिसरातील निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. त्यानंतर आरोपींनी तिला फातिमा नगर भागातील एका पिकअप बोलेरो गाडीत नेऊन पुन्हा अत्याचार केले. याप्रकरणी प्रथम तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर तो शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

शहरात संतापाची लाट, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये चिंता

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत 48 तासांच्या आत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, आरोपी मोकाट

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शेलापुर या गावात एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले असताना अद्याप आरोपी मोकाटच असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान आरोपीला अटक न केल्याने गावातील शेकडो महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अद्याप मोकाट असून या आरोपीचे नातेवाईक हे पीडीतेला व तिच्या पालकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचे  या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांना आंदोलकांची मागणी लक्ष्यात घेत अधिक जलद गतीने तपास करण्याचे आश्वासन दिलं आहे. मात्र यावेळी आक्रमक महिलांनी बुलढाणा पोलिसांचा ही निषेध नोंदवला व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.