बेशिस्त वाहनचालकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ कारवाई; 13 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल, पुणे पोलिस ॲक
पुणे: पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर परिसरात केलेल्या नाकाबंदीत दोन तासात 1518 वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवशी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1518 वाहनचालकांकडून 13 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुपारी चार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदीदरम्यान शहरातील 78 महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार 187 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.
1518 वाहनचालकांवर कारवाई
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट परिधान न केलेल्या 1518 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या नाकाबंदी मोहिमेत पोलिस सह आयुक्त, चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, दहा सहाय्यक पोलिस आयुक्त आणि 39 पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आणि वाहतूक शाखेसह 97 पोलिस अधिकारी तसेच 1872पोलिस अंमलदार सहभागी होते. पुढील काही दिवस ही नाकाबंदी असणार असल्याची शक्यता आहे.
दोन हजार पोलिसांची फौज रस्त्यावर
बेशिस्त वाहनचालकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी सुमारे दोन हजार पोलिसांची फौज रस्त्यावर उतरली होती. पोलिसांनी पुणे शहराच्या विविध भागात काल (सोमवारी) नाकाबंदी केली. यावेळी बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. केवळ दोन तासांत दीड हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहरात बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि रहदारीच्या ठिकाणी सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती.
13 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल
या नाकाबंदी मोहिमेत पोलिस सह आयुक्त, चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, दहा सहाय्यक पोलिस आयुक्त आणि 39 पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक आणि वाहतूक शाखेसह 97 पोलिस अधिकारी तसेच एक हजार 872 पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.नाकाबंदी दरम्यान शहरातील 78 महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार 187 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट परिधान न केलेल्या एक हजार 518 वाहनचालकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 13 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.