नराधम दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, स्वारगेट अत्याचार प्रकरणी पुणे न्यायालयाचा आदेश
पुणे : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेला पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये दत्ता गाडेने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर दत्ता गाडे पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकं पाठवली होती. दोन दिवस शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे शिरुरमधून दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे.
या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=rch3-qojklc
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.