कोकाटेंचं राजकीय भवितव्य आज ठरणार! शिक्षेच्या स्थगितीवर होणार फैसला; मंत्रिपद राहणार की जाणार?
मणक्राव कोकेटे: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात (Nashik Court) अपील केले होते. अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालय निकाल देणार आहे. कोकाटेंना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता असून त्यांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
शिक्षेच्या स्थगितीवर आज फैसला
यानंतर शिक्षेला स्थगिती मिळावी या अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा योग्य असल्याचे सांगत सरकार पक्षाने स्थगितीला जोरदार विरोध केला होता. मंत्री कोकाटे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अविनाश भिडे यांनी सरकार पक्षाचे मुद्दे खोडून काढत शिक्षेला अपिलाचा निकाल लागेपर्यंत स्थगितीची मागणी केली होती. त्यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. नितीन जीवने यांनी निर्णय येत्या १ मार्चपर्यंत निर्णय राखून ठेवला. आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज 1 मार्च रोजी फैसला होणार आहे. कोकाटेंना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://www.youtube.com/watch?v=Asvqcer6vea
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.