फरार कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडेना, आरोपपत्रात किती नंबरचा आरोपी? चार्जशीटमधून माहिती

बीड: राज्यसह देशभरात गाजत असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  या प्रकरणातील आरोप पत्र एबीपी माझाच्या हाती लागले असून वाल्मिक कराड (Walmik Karad)  हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे निश्चित झाले आहे. अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीतून झालेल्या वादा आणि त्यानंतर ही हत्या करण्यात आली असून पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात या संदर्भात महत्त्वपूर्ण उल्लेख करण्यात आले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्याहून अधिकचा कालावधी उलटला असला तरी या हत्येच्या कटातील आरोपी असलेला कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्यात पोलिसांना सातत्याने अपयश आले आहे. अशातच पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा नंबर आठव्या क्रमांकावर लागला आहे.

संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडच मास्टरमांईंड

पोलिसांनी सादर केलेल्या आरोप पत्रात पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार हा वाल्मिक कराड (Walmik Karad)  आहे. तर दोन नंबरचा आरोपी हा विष्णू चाटे,  तीन नंबरचा आरोपी सुदर्शन घुले आहे. तर चार नंबरचा आरोपी प्रतीक घुले आहे. पाच नंबरला सुधीर सांगळे, सहा नंबरला महेश केदार, तर  सात नंबरचा आरोपी जयराम चाटे,  तर आठ नंबरचा फरार आरोपी कृष्णा आंधळे हा असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील आरोपींची क्रमवारी ही त्यांच्या कृत्यानुसार ठरवण्यात आली आहे.  यातील प्रमुख आरोपी हा सुदर्शन घुले असून त्यानेच सरपंच देशमुख यांना जबर मारहाण केल्याचे यात उल्लेख करण्यात आला आहे. असेच संतोष देशमुख यांना घेऊन जाणारा व्यक्तीही सुदर्शन घुले होता.

खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख

29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर सहा तारखेला देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला आणि मारहाण झाली. या महाराणीच्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. त्यानंतर नऊ तारखेला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या तिन्ही प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते एकत्रित असून त्यांनी हा कट कुठे रचला, याची संपूर्ण माहिती पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागली आहे. खंडणी मागितली आणि ती न दिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे जवळजवळ उघड असल्याने 80 दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबनंतर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=iqia6qtyg3q

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.