वाल्मिक कराड अन् त्याच बायकापोरं गडगंज श्रीमंत, एसआयटीने कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा काढला
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) तपासादरम्यान वाल्मिक कराड याच्या नावावर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचा तपशील समोर आणला आहे. ज्यामध्ये शेती, प्लॉट, गाळे आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. याची यादी ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याची ही सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यासाठीचा एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये अर्ज करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याची पत्नी मंजिरी, मुलगा श्री गणेश यांच्या नावावरही काही प्रॉपर्टी आहे. ही सगळी प्रॉपर्टी ही 2020 ते 2024 मध्ये खरेदी करण्यात आली आहे . तर काही मालमत्तांचे बँकांकडे गहाणखत केले आहे.
वाल्मिक कराडच्या मालमत्ता कोणत्या आणि कुठे?
* केज शहरात नगरपंचायत झोन क्रमांक 1.15 सर्वे क्रमांक 215/6 क्षेत्रफळ 2500 चौरस फूट त्यात 232.26 चौरस मीटर आरसीसी बांधकाम क्षेत्र 69.78 चौरस मीटर हे 29 11 2024 रोजी खरेदी करण्यात आले याची तत्कालीन किंमत आहे 1 कोटी 69 लाख.
* दगडवाडी विभागात शेतजमीन खरेदी केली 31 1 2020 रोजी ज्याची किंमत आहे 48 लाख 26 हजार
* मौजे तडोळी येथील जमीन गट नंबर 82 मधील एकूण क्षेत्र 12 हेक्टर दहा एक 2023 रोजी खरेदी करण्यात आली तत्कालीन किंमत होती पाच लाख 84 हजार
* शेतजमीन कोरडवाहू मौजे परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ येथील नगरपालिका कक्ष बाहेरलस न.63/2मधील ऐकून क्षेत्र 3 तीन हेक्टर 11 आर पैकी एक हेक्टर 90 आर खरेदी केली गेली खरेदीचा दिनांक होता 8 7 2024 आणि खरेदीची किंमत होती 25 लाख 35 हजार रुपये.
* उस्मानाबाद जनता सहकारी बँक परळी वैजनाथ यांच्याकडे 13/12/23 रोजी पाच कोटी पन्नास लाख रुपयांसाठी काही प्रॉपर्टी गहाण खत म्हणून करण्यात आल्या
वाल्मिक कराडचं गहाणखत असलेल्या मालमत्ता कोणत्या?
1-रेसिडेन्सी प्रॉपर्टी, मासाहेब नगर अंबाजोगाई रोड परळी सर्वे नंबर 26 प्लॉट नंबर 10 आणि 11 मध्ये एकूण 380.77 स्क्वेअर मीटर , 418.96 स्क्वेअर मीटर आरसीसी बांधकाम
2-दगडवाडी तालुका परळी इथं वाल्मीक कराड स्टोन क्रशर युनिट आहे
3-पांगरी तालुका परळी जिल्हा बीड ओपन लँड प्रॉपर्टी
उस्मानाबाद जनता सहकारी बँक याच्याकडे 4 /12/ 2019 रोजी दोन कोटी 67 लाख रुपयांसाठी पाच प्रॉपर्टी गहाणखत म्हणून करण्यात आल्या.
1- स्टोन क्रेशर विथ इंडस्ट्रियल एने प्रॉपर्टी गट क्रमांक 167 168 170 171 दगडवाडी तालुका परळी वैजनाथ
2-रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी सीटीएस नंबर 4205, 4538 अंबाजोगाई नाका, मासाहेब नगर परळी वैजनाथ ,जिल्हा बीड
3-एग्रीकल्चर ओपन लँड प्रॉपर्टी गट नंबर 57 पांगरी तालुका परळी जिल्हा बीड
4-वैजनाथ ॲग्रीकल्चर लँड प्रॉपर्ती गट नंबर 77 पांगरी तालुका परळी जिल्हा वैजनाथ
5-अग्रिकल्चर ओपन लँड प्रॉपर्टी गट नंबर 257 पांगरी तालुका परळी जिल्हा बीड
31 ऑगस्ट 2020 रोजी दगडवाडी गावामध्ये दर मूल्य 57 70 प्रति आर प्रमाणे 48 लाख 26 हजार रुपयांची जमीन खरेदी केली गेली
वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावावर संपत्ती
वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांच्या नावावर किती प्रॉपर्टीची कागदपत्रं एसआयटीला मिळाली, त्यावर एक नजर टाकूया. जिरायती जमीन मौजे वडगाव तालुका परळी गट नंबर 2003 क्षेत्रफळ 11 हेक्टर पाच आर पैकी एक हेक्टर 79 आर जमीन खरेदी केली गेली खरेदीचा दिनांक आहे 11 सात 2024 आणि ही 13 लाख 15 हजार रुपयाला खरेदी करण्यात आली.
वडगाव संघ 253 तालुकासचा तालुका बीड 11.5 आर पैकी 3.64 जमीन खरेदी केली गेली याची किंमत होती एक लाख 47 हजार 600 रुपये
वाल्मीक कराड चा मुलगा श्री गणेश कराड याचनावरही काही जमीन एसआयटी ला तपासा दरम्यान मिळाली आहे. शिरसाळा गावामध्ये जमीन गट क्रमांक 267 मधील खुला प्लॉट नंबर दोन एकूण क्षेत्रफळ 581 चौरस मीटर तीन एक 2023 रोजी खरेदी करण्यात आला त्याची किंमत आहे सात लाख 40 हजार इतकी आहे.
वरील सगळ्या किमती या रेडिरेकनर दराप्रमाणे तत्कालीन खरेदी खतात दिलेल्या आहेत. या मालमत्तांची किंमत आताच्या बाजारभावानुसार जास्त असू शकते.
https://www.youtube.com/watch?v=blgrrur-xuo
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.