जयकुमार गोरेंवर महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप, संजय राऊत-रोहित पवारांविरोधात हक्कभंग
मुंबई:राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्याविरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय . संजय राऊत, रोहित पवार आणि लय भारी youtube चॅनेल यांच्या विरोधात हक्क भंग दाखल करण्यात आले आहे .जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने विनयभंग केला असे आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे .
या संदर्भात काल ( 5 मार्च ) ज्यांना आज माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर मी आजच सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं सूतोवाच केल्यानंतर आज थेट हक्क भंग दाखल करण्यात आला आहे .जयकुमार गोरे यांच्याकडून थेट न्यायालयाची प्रत देत निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितलं .त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्यांनी नाव घेऊन आरोप वक्तव्य केले त्यांच्यावर हक्क भंग दाखल करण्यात आलाय .यात संजय राऊत रोहित पवार यांच्यासह लय भारी नावाचे युट्युब चॅनेलचाही यात समावेश आहे .
नेमके प्रकरण काय ?
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आपल्याला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते. हे प्रकरण 2019 साली निकालात निघाले होते. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मुंबईत विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली होती.
माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता, 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे. मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते. तुम्हीही (पत्रकार) त्यापेक्षा मोठे नाही. हा निकाल येऊन सहा वर्षे झाली आहेत. किमान कुठल्यावेळी विषय समोर आणावा, याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असे मला वाटते. असे ते म्हणाले होते.
https://www.youtube.com/watch?v=tgjyn311-5s
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.