जयकुमार गोरे आणखी एका महिलेसोबत माझ्यासारखंच वागलेत, ती लवकरच समोर येईल; पीडित महिलेचा दावा

सातारा: एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात 17 तारखेपासून उपोषणाला बसण्याबाबत मी ठाम असल्याचे या महिलेने सांगितले. मला या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. तरीही मी शांत होते. मला ज्यावेळी पत्र आलं त्यावेळी मी मला त्रास होतोय यासाठी कलेक्टर ऑफिसला दिवसभर थांबून कलेक्टरांना ही सर्व हकीकत सांगितली. त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांना सांगितली. मात्र, माझी कोणी दखल घेतली नाही किंवा या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलीस आले नसल्याचे देखील यावेळी महिलेने सांगितले. त्यामुळे मी 17 तारखेला माझी बदनामी होत असल्याने उपोषण करणार असल्याचा निर्णयावर ठाम असल्याचे महिलेने सांगितले. (Satara Crime News)

यावेळी संबंधित महिलेने आणखी एक खळबळजनक दावा केला. गेल्या दोन दिवसांपासून आणखी एक महिला माझ्या संपर्कात आहे. मी तिचं नाव सांगून तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, माझं जयकुमार गोरे यांच्याबाबत जे मत आहे, तेच तिचंही मत आहे. ती येत्या दोन दिवसांत मीडियासमोर येऊन जयकुमार गोरे यांच्याबाबत बोलेल, असा दावा संबंधित महिलेने केला. मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जयकुमार गोरे निर्दोष सुटला नसता, मी त्याच्यावर उपकार केले म्हणून तो सुटला; महिलेचा दावा

2019 साली जयकुमार गोरेला शपथविधीसाठी केस आडवी येत होती, तेव्हा त्यांनी मला प्रेशर आणलं. आम्ही तुम्हाला जीवे मारु, कुटुंबाला त्रास देऊ, अशी धमकी मला देण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये मी ती केस मागे घेतली. मी केस करताना डगमगले नाही, मी तेव्हाही डगमगले नाही.  मी म्हणाले की, मला लेखी लिहून हवं की, मी पुन्हा असं करणार नाही. कुठल्याहीप्रकारचा त्रास देणार नाही. मग जयकुमार गोरे यांनी मला माफीनामा लिहून दिला. त्यावेळी कोर्टाच्या चेंबरमध्ये जिथे मी भावासोबत बोलत होतो, तेव्हा गोरे यांनी मला दंडवत घातला होता. मला वाटली एवढी शिक्षा झाल्यावर हा पुन्हा असं करणार नाही. त्यामुळे चांगुलपणाच्या भावनेतून मी ते केस मागे घेतली. अन्यथा जयकुमार गोरे या केसमधून निर्दोष सुटले नसते. ही केस निर्दोष सुटण्यासारखी नव्हती. काल जयकुमार गोरे पेपर दाखवत होते, मला निर्दोष सोडण्यात आले आहे. पण जयकुमार गोरे निर्दोष असता तर पोलिसांनी 10 दिवस तुरुंगात का ठेवलं? मुंबई उच्च न्यायालयाने तुझा जामीन अर्ज का फेटाळला? सातारच्या कोर्टात अटकपूर्व जामीन का फेटाळला, पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्यावर गोरेला जामीन मिळाला. मी त्यावेळी उपकार करुन सोडलं, तर तू मलाच पु्न्हा त्रास द्यायला लागलास. त्याला कंटाळून मी पुन्हा संघर्ष करण्याचे ठरवले आहे, असे संबंधित महिलेने सांगितले.

जयकुमार गोरेंनी माझ्यासमोर दंडवत घातला होता, महिलेचा दावा

जयकुमार गोरे यांना एका महिलेला शरीराच्या काही अवयवांचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 2017 साली न्यायालयात गेले होते. 2019 साली न्यायालयाने आपल्याला याप्रकरणात निर्दोष मुक्त केल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना महिलेने म्हटले की, जयकुमार गोरे यांनी माझ्यासमोर साक्षात दंडवत घालत माफी मागितली होती. माझ्या मागे कोणताही बोलावता धनी नाही, मी एकटी खंबीर आहे. 17 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे, यावर मी ठाम आहे. मी संघर्ष करणार नाही तर दुसरा पर्याय वापरणार आहे. मी कुटुंबासह आत्मदहन करणार आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी माझ्यासोबत आणखी एका महिलेला त्रास दिला आहे ती महिला सुद्धा माझ्या संपर्कात असल्याचं या महिलेने सांगितलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=ELI4M_OOGYI

आणखी वाचा

तुम्ही महिलेला नाXX फोटो पाठवले की नाही सांगा, पत्रकाराच्या प्रश्नावर जयकुमार गोरे कोर्टाचा आदेश फलकवत म्हणाले…

अधिक पाहा..

Comments are closed.