EPFO नं केले 3 मोठे बदल, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे, थेट तुमच्या पैशांवर परिणाम होणार
नवी दिल्ली : संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचं पीएफ खातं ईपीएफओकडे काढलेलं असतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती उघडली जातात. त्यामध्ये ईपीएएफ आणि इपीएसमध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. ईपीएफओ सदस्यांसाठी ईडीएलआय योजना सामाजिक सुरक्षा कवच ठरणार आहे. या योजनेत ईपीएफओनं मोठे बदल केले आहेत. ज्यामुळं कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा मिळेल.
EDLI योजना काय आहे?
EDLI योजना हा EPF चा भाग आहे. ज्यामुळं एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याची विमा रक्कम त्याच्या कुटुंबीयाला मिळते.
कोणते बदल करण्यात आले?
1. पहिल्या नोकरीच्या पहिल्या वर्षात विमा संरक्षण
यापूर्वी एखादा कर्मचारी नोकरी लागल्यानंतर पहिल्या वर्षात दगावल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळत नाही. नव्या नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाला किमान 50000 रक्कम दिली जाणार आहे. याचा फायदा किमान 5 हजार कुटुंबांना होणार आहे.
2. नोकरी सुटल्यानंतर देखील फायदा
पहिल्यांदा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी सुटल्यानंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ईडीएलआयचा फायदा मिळत नसे. आता नव्या नियमानुसार जर शेवटच्या ईपीएफ योगदानानंतर सहा महिन्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा रक्कम मिळेल. मात्र,त्याचवेळी कर्मचाऱ्याचं नाव कंपनीच्या रोलवरुन पूर्णपणे हटवलं असून नये.
नोकरी बदलली तरी विमा संरक्षण
पहिल्यांदा काही कर्मचारी नोकरी बदलायचे त्यावेळी ते काही दिवस किंवा आठवडे बेरोजगार रहायचे. ती नियमित सेवा मानली जायची नाही. त्यामुळं कुटुंबाला विमा रक्कम मिळत नसे. मात्र आता दोन नोकऱ्यांमध्ये दोन महिन्यांपर्यंतचं अंतर असेल तर ती सेवा निरंतर मानली जाईल.त्या कुटुंबाला देखील विमा रक्कम मिळेल. याचा फायदा जवळपास 1000 कुटुंबांना होईल.
आता कुटुंबाला किमान अडीच लाख ते सात लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळेल. सध्या व्याज 8.25 टक्के मिळणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफचा व्याज दर 8.25 टक्के निश्चित केला आहे. ईपीएफओच्या मतानुसार दरवर्षी 14000 कुटुंबांना फायदा होईल. यामुळं कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळेल.
इतर बातम्या :
RBI : आरबीआयची मोठी घोषणा, 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा आणणार, जुन्या नोटांचं काय होणार?
अधिक पाहा..
Comments are closed.