धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण; तरूणाला अमानुषपणे मारहाण क
बीड: बीडमध्ये सध्या समोर येत असलेल्या घटना, मारहाणीचे व्हिडिओ यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही माहिन्यांपुर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्यान चर्चेत आहे, अशातच बीडमधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तींयाचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ, ऑडीओ क्लीप यामुळे बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, बीडचं बिहार होतं आहे का असा सवाल निर्माण झाला आहे, अशातच धनंजय मुंडे यांना देखील यामुळे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये धनंजय देशमुख यांचे साडू यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला होता, त्याबाबत त्याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आज दादासाहेब खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला असल्याची माहिती समोर आली आहे. दादा खिंडकर याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर अटक दाखवून पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिंडकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 307, अपहरण, कट रचणे यासह इतर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपीमध्ये दादासाहेब खिंडकर सह इतरांचा समावेश आहे. दादासाहेब खिंडकर हे मृत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला आहे.
एका तरुणाला अमानुष मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरा तिसरा कुणी नसून तो धनंजय देशमुखांचा साडू आहे. धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता. एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल दादा खिंडकरमुळे उपस्थित झाला होता. धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिंडकर, ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होतोय, 13 जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोगमध्ये टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होता. दादा खिंडकर बीडमधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहेत. धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून एका युवकाला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आल्यावर खळबळ उडाली, दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती.
नेमकं काय प्रकरण?
संबंधित व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण झालेला मुलगा ओंकार सातपुते असून तो बाभुळवाडी गावातील आहे. मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा बेडूकवाडी गावचा सरपंच दादा खिंडकर आहे. दादा खिंडकरसह मारहाण करणार दुसरा व्यक्ती नाना म्हणून आवाज देत आहेत तो पोलीस कर्मचारी आहे. सदर पीडित ओंकारने दादा खिंडकर गँग विरुद्ध पोलिसात तक्रार दिली, म्हणून इतकी अमानुष मारहाण केली. सदर मुलाला सात जणांनी मिळून अपहरण करून खिंडकर याच्या शेतात नेऊन मारहाण केलेली आहे. सदर घटना ही साधारण दोन ते तीन महिने आधीची आहे. दादा खिंडकर याच्यावर याआधी बिड आणि पिंपळनेर पोलिसात 307, 395, 353 यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. फिर्यादीवर मारहाण करून दमदाटी करून गुन्हे मागे घ्यायला लावल्याचेही काही प्रकार याने घडवले आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.