हार्दिक पांड्यावर बॅन, CSK विरुद्ध कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार?

आयपीएल 2025 हार्दिक पांड्या मुंबई भारतीय: आयपीएल 2025 चा शुभारंभ 8 दिवसांनी म्हणजेच 22 मार्चपासून होणार आहे, तर अंतिम सामना 25 मे 2025 रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. यानंतर 23 मार्च रोजी दोन सामने खेळवण्यात येतील. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना रंगणार आहे. मात्र याआधी मुंबई इंडियन्सबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या 2025 च्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) खेळता येणार नाही. त्यामुळे एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचं कर्णधार सुर्यकुमार यादव सांभाळताना दिसताना दिसेल.

हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी-

आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर हार्दिक पांड्यावर वर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. एमआय संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नसल्याने आयपीएल 2025 च्या हंगामापर्यंत बंदी कायम राहील. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्ध संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही. हार्दिकला आयपीएल 2024 मध्ये तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी दंड ठोठावण्यात आला होता. लीगच्या नियमांनुसार, जेव्हा एखादा संघ एका हंगामात तीन वेळा आवश्यक ओव्हर-रेट राखण्यात अपयशी ठरतो, तेव्हा कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नामन धार, रॉबिन मीन्ज, रायन रेटिकल्टन, कृष्णन श्रीजित, बाव्हॉन जॅकोब्स, हार्दिक पांड्या, दीपक चाहर, राज बाव, मिशेल सॅनर, जसप्रित ब्यूम ह्नापार, राशनफल, राशनफल, रॅशानफर, तेंडुलकर, लिझार्ड विल्यम्स

पाच महागडे खेळाडू कोणते ठरले?

लिलावातील पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. व्यंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनाही पंजाब किंग्सने विकत घेतले. यावेळी अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्सने 18 कोटी रुपये मोजले.

संबंधित बातमी:

Yuzvendra Chahal-RJ Mahvash: बॉडीबिल्डरपेक्षा बारीक मुलंच जास्त आवडतात…; आरजे महवशने युझवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगची दिली हिंट?, VIDEO

अधिक पाहा..

Comments are closed.