धक्कादायक! भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, भाईंदर परिसरात खळबळ, 2 जणांना अटक

मुंबई : होळी आणि धुळवड सणानिमित्त मीरा-भाईंदर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तावर तैनात होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास भाईंदर परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना दोन गटांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती मिळाली होती. गोपनीय विभागातील पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे हे शिवसेना गल्लीतील नरसिंह मैदानाजवळ भांडण सोडवण्यासाठी गेले असता, अचानक दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखणी झाले आहेत.

पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन केली अटक

बाबू नेपाली आणि दिलीप भीमबहाद्दूर या दोघांनी पोलीस हवालदार काशिनाथ भानुसे यांच्या पोटावर आणि हातावर वार केले. तसेच त्यांना धक्का मारून खाली पाडले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच भाईंदरचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन बाबू नेपाली आणि दिलीप भीमबहाद्दूर यांना अटक केली आहे. जखमी हवालदार भानुसे यांना सुरुवातीला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी वोकहार्ड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाईंदर परिसरात खळबळ

या घटनेमुळं भाईंदर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सुरक्षेसाठी अधिक बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला या गंभीर गुन्ह्यांखाली भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

देशभरात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा

आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, आज सर्वजण होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. होळीच्या या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय देशभरातील विविध सेलिब्रिटी होळीच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी होळीसोबतच रमजानच्या जुम्माच्या नमाजचा दिवसही आहे. यामुळे देशातील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात या होळीच्या सणाला गालबोट लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणी दोन गटांमध्ये वाज झाल्याचे प्रकार झाले आहेत. यामध्ये काहीजण जखमी देखील झाले आहेत. अशा ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Buldhana Crime News: जुना वाद उफाळून आला, प्राणघातक हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस स्थानकात आणला, अन् पुढे…

अधिक पाहा..

Comments are closed.