एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; संजय राऊतांचा मोठा दावा, पृथ्वीराज चव्हाणांचंही घेतलं नाव

Sanjay Raut On मराठी: काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काँग्रेसमध्ये यावं, त्यांना आम्ही मुख्यमंत्री करु असं नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोलेंच्या या ऑफरवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंची ही ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो, असं संजय राऊत म्हणाले. नाना पटोले आमचे सहकारी आहेत जेष्ठ नेते आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असं संजय राऊतांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंच्या भगव्या रंगाशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांचा भाजपशी संबंध आहे. एकनाथ शिंदेंचा भगवाशी काही संबंध नाही. भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; संजय राऊतांचा दावा

एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा…अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

सरकार ढोंगी आणि दुतोंडी-

महायुतीचं सरकार ढोंगी आणि दुतोंडी  आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,आत्महत्येवर तोंड उघडत नाही. बुलढाण्यातील कैलास या शेतकऱ्याला कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाला मिळाला होता. कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केलीय. केवळ कैलासची आत्महत्या नाही तर सर्व शेतकऱ्याची ही आत्महत्या आहे. आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा. सरकार काहीच करत नाही. हे सरकार खोक्या बोक्याच्या मागे लागले आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार?, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, असं संजय राऊतांनी सांगितले.

संजय राऊतांची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=bpmufoljqey

संबंधित बातमी:

Sharad Pawar: शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कौतुक, आभार आणि पत्रातून केली ‘ही’ मागणी

अधिक पाहा..

Comments are closed.