बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात ‘आम्ही कारवाई करु शक
अंजली दमानिया: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) बीडचे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर बीडमधील अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. आता पुन्हा एका घटनेनं बीड हादरलंय. एका शिक्षकाने बँकेच्या बाहेर फाशी घेऊन, स्वत:ला संपवलं. धनंजय अभिमान नागरगोजे या 30 वर्षीय शिक्षकाने स्वत:चं आयुष्य संपवताना लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत, असे त्यांनी म्हटले. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येप्रकरणी सहाही जणांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.
सरकार जबाबदार नाही का?
अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं. धनंजय नागरगोजे काहीच न विचार करता गेले? ३ वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून. किती निर्दयी आहेत ही माणसं… हे… विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड, थर्ड ग्रेड माणस आहेत ही. 18 वर्ष पगार दिला नाही आणि पगार मागितला म्हणून हाल केले? पण हे एकटेच कारणीभूत आहेत का? शासन काय करतंय? मी त्यांचे फेसबुक पाहिले. 8 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 ला आझाद मैदानात आंदोलन केले. उपयोग काय झाला? सगळ्यात depressing जागा आहे ती. असंख्य लोक येतात आंदोलनात सहभागी होतात, नारे देतात, आक्रोश करतात आणि आल्या पावली परत जातात. मग आज धनंजय नागरगोजेने प्राण दिला ह्याला सरकार जबाबदार नाही का? सामान्य माणसाने कसं लढायचं? ऐका त्यांची व्यथा, असे त्यांनी म्हटले आहे.
आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झाल.
धनंजय नागरगोजे काहीच न विचार करता गेले ? ३ वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून.
किती निर्दयी आहेत ही माणस….
हे ….
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ…– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_डमानिया) 15 मार्च, 2025
अंजली दमानियांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा
अंजली दमानिया यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ज्या लोकांचा उल्लेख धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या फेसबुकच्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे का? अशी विचारणा मी नवनीत कावत यांच्याकडे केली. ते म्हणत आहेत की, धनंजयच्या वडिलांनी तक्रार दाखल केली नाही. त्या संस्थेला सरकार काढून पैसे मिळाले नाही म्हणून त्यांच्यावर आरोप करता येणार नाही. Suo Moto FIR करा अशी विनंती मी त्यांना केली, पण तसं करता येणार नाही, असं ते म्हणाले. उद्या पुन्हा त्यांच्याशी बोलेन. पण सरकार काहीतरी करेल असे त्यांचे म्हणणे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
ज्या लोकांचा उल्लेख धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या फेसबुक च्या सुसाइड नोट मध्ये केला आहे, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे का अशी विचारणा मी श्री नवनीत कावत यांच्याकडे केली. ते म्हणत आहेत की धनंजय च्या वडिलांनी तक्रार दाखल केली नाही. त्या संस्थेला सरकार काढून पैसे मिळाले…
– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_डमानिया) 15 मार्च, 2025
अधिक पाहा..
Comments are closed.