लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांना चांगलंच सुनावलं
बुलढाणा : राज्य पुरस्कारप्राप्त शेतकरी (Farmer) कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी हक्काचं पाणी मिळावं अशी मागणी करत त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. या घटनेनं राज्यभरातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत संतापही व्यक्त केला. त्यातच, कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला मंत्री महोदयांसह दिग्गजांची उपस्थिती होती. त्यावेळी, कैलास यांच्या बहिणीने आपला मनातील संताप बोलून दाखवला. लाज वाटली पाहिजे, पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? लाज नाही वाटत. माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा, अशा शब्दात पीडित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीने मंत्री महोदयांनाच सुनावले आहे. बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी मंत्री प्रतापराव जाधव आणि आ.सुनील कायंदे यांच्या समोर राजकारण्यांना खडे बोल सुनावले.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे संपन्न झाला. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, महिला शेतकरीही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आ. सुनील कायंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. “माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका, तर बलिदान हा शब्द वापरावा… असं भावनिक आवाहनही सत्यभामा नागरे यांनी केलं.
माझ्या भावाला हे माहित होतं की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. देशाला राजकारणी हे कृषी प्रधान म्हणतात, यांना लाजा वाटायला पाहिजे की, कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो आणि तेही पाण्यासाठी, अशा शब्दात बहिणीने आपल्या भावाच्या मृत्यूनंतर तीव्र भावना व्यक्त केल्या. आपले पालकमंत्री यांना वारंवार माझ्या भावाने विनंती केली. मात्र, अशा पालकमंत्र्यांना पालकत्व स्वीकारता येत नसेल तर कशाला पालकत्व स्वीकारतात? लाजा वाटल्या पाहिजे, असे खडे बोलही सत्यभामा नागरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोरच सुनावले.
दरम्यान, शेतकरी कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमादरम्यान सत्यभामा नागरे यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आ.सुनील कायंदे हे खाली मान घालून ऐकत राहिल्याचं दिसून आलं. दु:खाच्या प्रसंगी सांत्वन करायला गेलेल्या नेतेमंडळींनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीने चांगलीच चपराक लगावल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्याच्या ब्रेसलेटवर, बसेस जळत आहेत; कुकचा 90
अधिक पाहा..
Comments are closed.