तब्बल 8 कोटी 71लाखांच्या कृषी पूरक साहित्य वाटपात घोटाळा; समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील प्रकार

नागपूर बातम्या: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच काही महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांशी हातांशी पकडून मोठा घोटाळा (Scam) केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात तब्बल 8 कोटी 71 लाख रुपयाचे कृषी पूरक साहित्य वाटपात घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार पुढे आल्यानंतर आणि यातील महिला तक्रारदार पुढे आल्यानंतर  रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला हा संपूर्ण प्रकार लक्षात आणून दिला आहे. सोबतच या प्रकरणाची लेखी तक्रार देखील केली आहे. परिणामी, प्रधानमंत्री कार्यालयाने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

जिल्ह्याच्या खनिज निधीतून 100 महिला बचत गटाला कृषिपूरक साहित्य वाटण्याची योजना तयार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी त्यासाठी 100 महिला बचत गटाची निवड केली आणि साहित्याचा वाटप केला गेला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी फोटो काढून योजना यशस्वी झाल्याचे दाखवले. मात्र काही दिवसानंतर  पुरवठादाराने वितरित साहित्य परत नेलं असल्याचे पुढे आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.