हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस, काँग्रेस बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक; नारायण राणेंचा सडकून प्रह
हर्षवर्धन सपकळ वर नारायण राणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) चांगलंच राजकारण तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे वक्तव्य केले. औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. हर्षवर्धन सपकाळ यांना वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार पलटवार केला जात आहे. आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तोफ डागली आहे.
नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस आहे, अशी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वक्तव्याचा राणेंनी समाचार घेत, औरंगजेब कोण होता महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असून अशा माणसाची उपमा देत आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं मग हा मूर्ख माणूस असला पाहिजे. त्यांना या राज्यातले प्रश्न माहित नाही. कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा आहे हे त्यांना माहित नाही. हा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी नेमणूक झाली नाही तर पक्ष बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक झाल्याची टीका नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा संपूर्ण राजकीय इतिहास काढा
राणे काँगेसमध्ये कोणत्या महत्वाकांक्षा घेऊन गेलेले. मी काँग्रेसमध्ये गेलो नव्हतो, तर आमच्याकडे कोण आले या विषयात मला पडायचं नाही. या जुन्या विषयात मला काही बोलायचं नाही. आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही, त्यामुळे तो विषय आजचा माझा नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा संपूर्ण राजकीय इतिहास काढा. या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान काय हे सांगा आणि मग या विषयावर बोला, असेही टीका नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केली आहे.
सुप्रिया सुळेंच्या दाव्यावर काय म्हणाले राणे?
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, असा मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. याबाबत विचारले असता याबाबत सरकारच्या होम डिपार्टमेंटने पहावे, असं म्हणत न सांगणं हा ही गुन्हा आहे, सरकार यांच्यावर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.