नागपूरच्या रस्त्यावरील हिंसाचाराच्या खाणाखुणा पुसल्या; दगडांचा खच अन् जळालेली वाहनं हटवली
नागपूर: औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काल रात्री महाल परिसरात प्रचंड दगडफेक (Stone Pelting) झाली होती. या भागात हिंसक जमावाकडून क्रेनसह अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे महल परिसरातील रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता. मंगळवारी सकाळी नागपूर (Nagpur News) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे दगड उचलून रस्ता साफ करण्यात आला आहे. तसेच जाळपोळीच्या खुणाही मिटवण्यात आले आहेत. जेणेकरुन परिस्थिती सामान्य होऊन नागपूरमधील जनजीवन पूर्वपदावर येईल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रशास वेगाने कामाला लागले आहे.
नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये लोकांना घराबाहेर निघू नये तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील वातावरणात तणाव कायम असल्याचे दिसत आहे.
दंगलखोर बाहेरुन आले, पोलिसांना आधारकार्ड आणि ओळखपत्रं सापडली
नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलीस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दंगलखोरांकडून वाहनांमध्ये कापडांच बोळे आणि पेट्रोल बॉम्ब टाकले जात होते. मोठा जमाव असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अडचण आली, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
अकोल्यात खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला
नागपूरात झालेल्या दोन गटातील वादाचे पडसाद इतर जिल्ह्यात उमटू नये, यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी राज्यातल्या अनेक संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अकोल्यात अति संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहर पेठ, पोळा चौक, भांडपुरा आणि अकोटफैल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. आरसीपी आणि एसआरपी त्याशिवाय दंगल नियंत्रण पथके इथे तैनात करण्यात आले आहेत. याच परिसरात अनेकदा मोठ्या प्रमाणात दंगली उफाळून आले होते.. यासाठीच खबरदारी म्हणून अकोला पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=yzpwbjggijzw
आणखी वाचा
नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी
अधिक पाहा..
Comments are closed.