मोठी बातमी: भाजपने सहकार क्षेत्रातील बडा मोहरा गळाला लावला, सीताराम घनदाटांनी घेतले कमळ हाती
परभानी: विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेले माजी आमदार तसेच अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट आता कमळ हातात घेतले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमधून 24 ऑक्टोबर 2024 ला वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी प्रवेश केला होता आता अवघ्या साडेतीन महिन्यांमध्ये सिताराम घनदाट (Sitaram Ghandat) भाजपमध्ये प्रवेश केला आहे . परभणीच्या सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून सिताराम घनदाट यांना पाहिलं जात आहे .माजी आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते .
राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया वंचित टू भाजप
राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या बड्या पराभवानंतर महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनाही मोठा फटका बसला .दरम्यान महायुतीत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग वाढले आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला महायुतीत रस्सीखेच सुरु झालेली असताना परभणीतून भाजपने एक बडा मोहरा गळाला लावला आहे . यादी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याच्या सत्तेत उडी मारत हाती घड्याळ बांधले होते . विधानसभेपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्षात त्यांनी प्रवेश केला होता .अभ्युदय सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदार घनदाट यांचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे . परभणीचे माजी आमदार आता कमळ हातात घेणार आहेत .भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे . .
16 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिताराम घनादाट यांनी पक्षप्रवेश केला होता. चार वर्षांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजनमध्ये पक्षप्रवेश केला. आता पुन्हा एकदा सिताराम घनदाट पक्षप्रवेश करत असून भाजपचे कमळ ते हाती घेणार आहेत.गंगाखेडचे माजी आमदार सिताराम घनदाट यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. २००४ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले होते. २००९ साली विधानसभा निवडणूक ८२ हजार मतांनी निवडून आले होतेसिताराम घनदाट हे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड याचे अध्यक्ष आहे.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.