नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित, रामगिरी महाराजांची औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे वक्तव्य, म्हणाले..
रामगीरी महाराज: औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले .नागपूरमध्ये दोन गटात दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला .गाड्यांची जाळपोळ झाली .या हिंसाचारावरून सध्या राजकीय वातावरणही तापलं आहे . दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून तसेच नागपूरच्या हिंसाचारावरून दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचारांचे आहेत .ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे सांगत क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याचा मागणीला समर्थन असल्याचे वक्तव्य महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केले आहे . ‘ABP माझा ‘ला दिलेल्या प्रतिक्रियेत सध्या अराजकता पसरली आहे .याचे कारण मुस्लिम धर्मियांमधील काही धर्मगुरू लहानपणापासून मुलांना भडकवण्याचा प्रयत्न करतात असे वक्तव्यही त्यांनी केले आहे .
दरम्यान नागपूर हिंसाचाराची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे .पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे .
काय म्हणाले रामगिरी महाराज ?
‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता औरंगजेबाने मंदिरे पाडून मशिदी बांधल्या,यासोबतच त्याने कुंभमेळ्यावर देखील हल्ला केला होता, संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी त्याने मारले.अश्या क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमच समर्थन आहे असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.
नागपूर येथे झालेल्या दंगली बाबत देखील रामगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहेत, ही दंगल पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे…सध्या अराजकता पसरवली जात आहे याच कारण मुस्लिम धर्मियातले काही धर्म गुरू हे लहान पानापासून मुलांना भडकवण्याच काम करतात असेही वक्तव्य महंत रामगिरी महाराजांनी केले आहे.
नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी
नागपूरमधील सोमवारच्या हिंसाचारावेळी पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल आहेत. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते, ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला आहे, मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.