लुडो गेमच्या बहाण्याने केला घात! दीड महिन्यांपासून प्लॅनिंग; माऊलीचा आधी गळा दाबून खून केला, न
पुणे: शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी गावातील शरीराचे तुकडे करून विहिरीत फेकलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आलं. दाणेवाडीमध्ये एका विहिरीमध्ये शीर, हात नसलेला मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा तापस सुरू झाला. शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या तरुणाचा मृतदेह दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विहिरीत बुधवारी (दि. 12) सकाळी आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. समलैंगिक संबंध माहिती झाल्याच्या कारणातून त्याच जोडप्याकडून माऊली गव्हाणे या 19 वर्षे तरुणाचा अमानुषपणे खून करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर हा माऊली गव्हाणे याला संपवण्यासाठी दीड महिन्यांपूर्वीच कट रचला होता अशी माहिती समोर आली आहे, तर या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
6 मार्चला बेपत्ता झालेल्या माऊलीचा मृतदेह 12 मार्चला विहिरीत आढळला
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील तरुणाचा आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. मयताचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शरीराचे तुकडे करुन त्यांना पोत्यात भरून दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकले असल्याचे तपासात समोर आले आहे. माऊली सतीश गव्हाणे (वय 19 वर्षे, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्या खून प्रकरणी सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २० रा. दाणेवाडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 6 मार्चपासून बेपत्ता असलेल्या माऊलीचा मृतदेह 12 मार्चला विहिरीत सापडला. या खून प्रकरणातील आरोपी सागर गव्हाणे याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला 24 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपींनी दीड महिन्यांपूर्वीच माऊलीच्या खुनाचा कट रचला
दरम्यान, मृतावर दाणेवाडी येथे (काल) सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपींनी कट रचून माऊली गव्हाणे याचा निर्घृणपणे खून केला. आरोपींनी दीड महिन्यांपूर्वीच माऊलीच्या खुनाचा कट रचला होता. आरोपींचे एकमेकांसोबत समलैंगिक संबंध असल्याची माहिती मृत माऊली गव्हाणेला होती. तो या गोष्टीची वाच्यता कुठेतरी करेल आणि बदनामी होईल या भीतीपोटी आरोपी गेल्या दीड महिन्यापासून माऊलीला संपवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी माऊलीला बोलावून घेत त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. शीर धडावेगळे करून एक हात व पाय तोडला. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
तिघांचे मोबाईल एकाच वेळी स्विच ऑफ
मयत व दोन आरोपींचे मोबाईल त्या रात्री एकाच वेळी स्विच ऑफ झाले होते. ही माहिती पोलिसांनी तांत्रिक स्थळावर शोधली. याच माहितीच्या आधारे पोलिसांना हत्येचा शोध चार-पाच दिवसांतच लावता आला.
लुडो गेमचा बहाणा
सागर गव्हाणे व त्याच्या अल्पवयीन मित्राने दोन महिन्यांपूर्वीच माऊली गव्हाणेच्या हत्येचा कट रचला होता. 6 मार्चच्या रात्री आरोपींनी माऊलीला लुडो गेम खेळण्याचा बहाणा करून बोलवून घेतले. दाणेवाडी येथील विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीवर नेऊन त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन विहिरीत त्याच्या मृतदेहाचे वेगवेगळे अवयव टाकले.
अधिक पाहा..
Comments are closed.