समलैंगिक जोडप्यानं माऊलीला सांगितलं, ‘टॉर्चचा सिग्नल मिळताच ठरलेल्या ठिकाणी ये’; पुण्यातील त्या

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी गावामध्ये परिसरातील विहिरीमध्ये एका तरूणाचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे करून विहिरीत फेकलेल्या प्रकरणाचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे. दाणेवाडीमध्ये एका विहिरीमध्ये शीर, हात नसलेला मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या तरुणाचा मृतदेह दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विहिरीत बुधवारी (दि. 12) सकाळी आढळला होता. या खूनामागे समलैंगिक संबंध आणि बदवामी होण्याची भीती हे कारण असल्याची माहिती समोर आली आहे. माऊली गव्हाणे याला संपवण्यासाठी दीड महिन्यांपूर्वीच कट रचला होता अशी माहिती समोर आली आहे, तर या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तर ज्या रात्री माऊलीचा खून झाला त्या दिवशी त्याला आरोपींनी त्याला चर्चा करण्यासाठी बोलावलं असल्याची माहिती आहे.

तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये…

सागर गव्हाणे व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी गुरुवारी (दि 6) मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वाजता माऊलीशी चर्चा केली आणि त्यानंतर संबंधित विषय रात्री बसून मिटवून टाकू असं सांगितलं. यावेळी आरोपींनी माऊलीला सांगितलं की, आम्ही तुला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॅटरीचा उजेड तुझ्या घराकडे दाखवू त्यानंतर तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये. त्यानुसार बॅटरीचा उजेड पाहून माऊली रात्री सुमारे 11.30 वाजता त्या समलैंगिक जोडप्याकडे गेला. त्यानंतर सागर व त्याचा अल्पवयीन समलैंगिक साथीदार यांनी माऊलीला दाणेवाडी येथील परिसरात अगोदर त्याचा गळा दाबून त्याचा जीव घेतला. त्यानंतर येथील परिसरातील गोपाळवाडी येथील एका बंद खोलीमध्ये नेऊन इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने दोन्ही हात, शीर, पाय धडावेगळे केले आणि आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी शीर, एक पाय आणि दोन हात व धड हे अवयव घोडनदीच्या लगतच असलेल्या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये पोत्यात दगडी भरून फेकून दिले.

आपली बदनामी होऊ नये

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी असलेला सागर गव्हाणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध होते. या बाबतची माहिती माऊली गव्हाणेला माहिती होते. त्याने ही गोष्ट कुणाला सांगू नये, यामुळे आपली बदनामी होऊ नये, यासाठी आरोपींनी गुरुवारी, 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास माऊली याच्याशी चर्चा करण्याच्या बहाण्याने त्याला भेटायला बोलावलं. त्याच रात्री 11.30 वाजता भेटण्याचं ठरवलं. त्यानी टॉर्चच्या उजेडाचा इशारा दिला आणि माऊलीला एका ठिकाणी बोलावून घेतलं. यानंतर, दोघांनी माऊलीला गळा आवळून त्याला संपवलं. त्याचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्घृणपणे हात, पाय, धड आणि डोके वेगवेगळे केले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. शीर, एक पाय आणि दोन हात घोड नदीच्या काठावर असलेल्या विहिरीमध्ये टाकण्यात आले, या विहिरीमध्ये हे धड आढळून आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला ,सुरूवात झाली होती.

तिघांचे मोबाईल एकाच वेळी स्विच ऑफ

मयत व दोन आरोपींचे मोबाईल त्या रात्री एकाच वेळी स्विच ऑफ झाले होते. ही माहिती पोलिसांनी तांत्रिक स्थळावर शोधली. याच माहितीच्या आधारे पोलिसांना हत्येचा शोध चार-पाच दिवसांतच लावता आला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.