मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती

Nitesh Rane on Nagpur Violence : नागपूर येथे घडलेली घटना लक्षात घेता एकंदरीत ही घटना सुनियोजित कट असल्याचे पुढे येत आहे. काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणे हे कुठल्या संविधानात लिहिलंय? असा सवाल करत मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे आता प्रश्न उद्भवला आहे की, मुळात ट्राली भरून दगडी आल्या कुठून? त्यामुळे आता पोलिसांवर हल्ले (Nagpur Violence) करणाऱ्यांवर कशी कारवाई होते ते बघाच, असेही नितेश राणे म्हणाले.

येत्या गुरुवारी मी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच या कार्यक्रमाचे पाहिलं आमंत्रण मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देईल. मत्स्य खात्याचा मंत्री असल्याने माझी निमंत्रण पत्रिका देखील माशाच्या आकाराची आहे. माझ्या राजीनामे यांची मागणी कोणीही केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्या मधला मी एक आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे त्यामध्ये नितेश राणेंचं नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही. अशी स्पष्टोक्ती ही मंत्री नितेश राणे यांनी दिली. हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि आक्रमक नेता  होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावरील चर्चेवर आता स्वत: नितेश राणे स्पष्टीकरण दिले आहे.

असा प्रकार घडल्यानंतर आमचं देवाभाऊंचं सरकार गप्प बसेल का?- नितेश राणे

राज्यात आता पूर्वीसारखं काही घडवणं सोपं राहिलेलं नाही. पोलीस त्याठिकाणी आंदोलकांना शांत बसवण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हे आंदोलन कुठल्या चौकटीत बसते? असा प्रकार घडल्यानंतर आमचं देवाभाऊंचं सरकार गप्प बसेल, असे तुम्हाला वाटते का? संबंधितांना त्यांचा ‘पाकिस्तानातील अब्बा’ आठवेल, अशी कारवाई केली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. प्रत्येकाला आंदोलनाचा हक्का आहे. पण हे कोणतं आंदोलन? एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. ही हिंमत तोडण्याचं काम देवाभाऊंचं सरकार करेल, असे नितेश राणे यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवणे हे काँग्रेसच्या काळातील पाप- नितेश राणे

जालन्यामध्ये जो प्रकार झाला तो स्टेटस ठेवण्यावरून झाला आहे या प्रकारणावर अर्जुन खोतकर यांनी सभागृहात माहिती  दिली. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करणार आहोत असेही मंत्री नितेश राणे म्हणाले. जालना आणि नागपूर हे दोन्ही विषय वेगळे आहे. आमच्या राज्यात राहून आमच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर कोणी आक्षेपार्य वक्तव्य करेल तर त्याला आमचं सरकार योग्य ते शासन करेल. पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवणे हे काँग्रेसच्या काळातील पाप आहे. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=A_jzmg3yysu

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.