स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे अपहरण नव्हे तर अपघात; मित्रासोबत दार

पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे (Datta Gade) वकील साहिल डोंगरे (Sahil Dongre) यांनी त्यांचे अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार काल(मंगळवारी) देण्यात आली आहे. मात्र, डोंगरे हे दुचाकीवरून पडल्याने जखमी झाले असून, तक्रारीत तथ्य नाही. हा बनाव रचण्यात आल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.याबाबत डोंगरे यांनी मंगळवारी हडपसर पोलिस (Hadapsar Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. पहाटेच्या सुमारास काही जणांनी हडपसर येथील गाडीतळ परिसरातून त्यांचे अपहरण केले. गाडीत बसवून बेदम मारहाण करून दिवे घाटात सोडून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune Crime News)

या संदर्भात पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे माहिती देताना म्हणाले, “या तक्रारीची शहानिशा करण्यात येत आहे. रात्री दुचाकी घसरून अपघात झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.

शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील गाडे याने 26 फेब्रुवारीला पहाटे स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दोन दिवस शोध मोहीम राबवून ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी गाडेला गुनाटमधून अटक केली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

वकील डोंगरे यांचे अपहरण नव्हे तर अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहायक वकील डोंगरे यांचे अपहरण नव्हे तर अपघात झाल्याची शंका आहे. वकिलाला अपहरण, मारहाण नव्हे तर अपघातामुळे जखमा झाल्याची शक्यता आहे. पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचा अपघात होऊन जखमी झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दारू पिऊन वकील डोंगरे एका हॉटेल मध्ये बाहेर पडत असल्याचे सीसीटिव्हीमधून समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना काही लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिल्याबाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती. याप्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे हे रात्री सागर बार येथे रात्री 10 वाजता त्यांचे  मित्र अनिकेत मस्के याच्यासोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटिव्हीमधून समोर आलं आहे.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री 11.30 वाजता व पहाटे 05 वाजता दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले. डायल 108/112 वर कॉल झाल्याचे व सासवड पोस्टे येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचे दिसून आले. पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक इसमाचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचा फोन प्राप्त झाला. इतकच नाही तर डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे 108 वर फोन करून सांगितलं. त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल 108 ॲम्ब्युलन्स आली व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी घेऊन गेले. एकंदरीत सदर इसमाचे कोणत्याही प्रकारे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला आहे असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.