Nagpur Violence: 38 वर्षाच्या फहीम खानने जमाव जमवला, नागपूर राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?

नागपूर हिंसा: नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील महाल आणि लगतच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून (FIR) धक्कादायक माहिती समोर आली आहे. एबीपी माझाच्या हाती या एफआयआर बाबतची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. हिंसाचारातील मास्तर माईंडचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारणी फहीम खान नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

एफआयआरनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे. दरम्यान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 46 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दंगेखोरांना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नागपूर राड्याचा समांतर तपास नागपूर पोलिसांसह महाराष्ट्र एटीएस देखील करणार आहे. अशातच या हिंसाचारातील प्रकरणाचा मास्तर माईंड पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती प्राप्त झाली आहे.

फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष

नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 51 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र यात जो प्रमुख मानला जात आहे त्याचे नाव समोर आले आहे. 38 वर्षीय फहीम खान हा स्थानिक मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार नागपुरात सर्वप्रथम  महालपरा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही लोकांचा जमाव जमवून आंदोलन केलं होतं. यावेळी त्याने पोलिसांना निवेदन देऊन आपल्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले होतं.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही गटांना वेगवेगळे करत परिसरात शांतता प्रस्थापित केली होती.  मात्र सायंकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि जमाव पुन्हा याच परिसरात जमला. त्यानंतर एका गटाने आक्रमक पवित्र घेत दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली. अशी माहितीही आता पुढे आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=28bz6dztbbw

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.