हिंजवडीत आग लागलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं मेंटेनन्स झालं नव्हतं? चौघांचा होरपळून मृत्यू, दरवाजा

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघेही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर आयटीयन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्युमो ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं मेंटेनन्स झालं नव्हतं का? या प्रश्नांचा उत्तर पोलीस शोधत आहेत. हे सगळे कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.

टेम्पो ट्रॅव्हल्सचं मेंटेनन्स झालं नव्हतं?

आयटी हब हिंजवडीत शेकडो कंपन्यांमध्ये आयटीयन्स, बॅक ऑफिस, सुरक्षा रक्षक यांसह रोज पाच लाख कर्मचाऱ्यांची ये-जा होत असते. यातील ऐंशी टक्के कर्मचारी अशा खाजगी वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करतात, त्या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. त्याअनुषंगाने नवी नियमावली राबविण्याचा आता विचार केला जाणार आहे. आगीची ही घटना आज (बुधवारी,ता 19) सकाळी 8 च्या सुमारास घडली आहे. आगीत काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

डीसीपी विशाल गायकवाड यांनी घटनेबाबत दिली माहिती

पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी या घटनेबाबत एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, वाहनांची तपासणी करणे त्यांचा मेंटेनन्स करणे हे नियम आहेत. ज्या कंपनीच्या बसेस आहेत, त्या बसेससाठी काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. ही जी घटना घडलेली आहे ही आगीच्या शॉर्टसर्किटमुळे घडली आहे. झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली आणि यामध्ये ड्रायव्हरचा पाय देखील भाजला गेला. ड्रायव्हरने गाडीतून उडी मारली. पुढे जाऊन गाडी डिव्हायडरला आदळली, आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने पुढच्या लोकांना उतरणं शक्य होतं ते उतरले. पण, शेवटचे जे चार लोक होते, त्यांना उतरता आलं नाही. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, अशी माहिती विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

गाडीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींबाबतचा तपास सुरू आहे. तपासासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. आरटीओचे ऑफिसर्स बोलवण्यात आलेले आहेत. फॉरेन्सिक टीम देखील अचानक कशी लागली याचा तपास करत आहे, अशी माहिती बोलली त्यांनी दिली आहे. आज अचानक अशी दुर्दैवी घटना घडली, त्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत किंवा कंपनीच्या काही बसेस आहेत, त्यांना याबाबत माहिती देणार आहोत. त्याचबरोबर या संबंधीच्या दक्षता घेण्यात याव्यात आणि नियमांचं काटेकोर पालन व्हावं यासाठी आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत, असेही पुढे पोलिसांनी सांगितलं आहे

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोतून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचले. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्याने चार कर्मचारी आगीत होरपळले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आग – मृत आणि जखमींची नावं

मृत

-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40,
सर्व राहणार पुणे

जखमी झालेल्यांची नावे

-प्रदीप राऊत
-प्रवीण निकम
-चंद्रकांत मलजीत
-संदीप शिंडे
-विश्वनाथ झोरी
– जनार्डन हंबरडकर – टेम्पो ड्रायव्हर

https://www.youtube.com/watch?v=0ihhhu3c0d_0

अधिक पाहा..

Comments are closed.