IPL पूर्वी युझवेंद्र चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा, हायकोर्टाचे फॅमिली कोर्टाला
युझवेंद्र चहल आणि धनाश्री वर्मा घटस्फोट: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) हजेरी लावली. यावेळी वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिलासा नाकारल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच उद्या (20 मार्च) युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयाला दिले आहेत.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मानं (Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce) परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. वांद्रे कुटुंब न्यायालयानं (Bandra Family Court) घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता. यानंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मुंबई उच्च न्यायालयाच आव्हान दिलं होतं. यावर मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय रद्द केला. तसेच आगामी आयपीएलपूर्वी युझवेंद्र चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आयपीएल 21 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे उद्याच्या उद्या युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाबाबत निर्णय होणार आहे.
वांद्रेच्या कुटुंब न्यायालयात काय घडलेलं?
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने 21 फेब्रुवारी रोजी वांद्र्यातील कुटुंब न्यायालयात हजेरी लावली होती. गेल्या 18 महिन्यांपासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे वेगळे राहत असल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली. धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी वेगळं होण्याची कारणं विचारल्यानंतर कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेककांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं होतं.
युझवेंद्र चहल अन् आरजे महवशच्या डेटिंगची चर्चा-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान (Champions Trophy 2025) भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवश (RJ Mahvash) दुबई क्रिकेट मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. युझवेंद्र चहल आणि आरजे महवशला एकत्र पाहिल्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
https://www.youtube.com/watch?v=qkpfgiledem
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.