Video: भविष्यात मोठी MPSC भरती; परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
मुंबई : युपीएससीच्या धर्तीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ते तत्सम पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, एमपीएससी मंडळाबाबत सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो, एमपीएससीची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांमधील ताळमेळ नसल्याने विद्यार्थी आंदोलनाचं हत्यार उगारतात. तर, परीक्षांनंतर निकाल आणि नियुक्तीलाही एमपीएसीकडून तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप होत असतो. त्यामुळेच, राज्यातील एमपीएससी संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ॲड देतो आहोत, अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली. दरम्यान,अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना ह्या जागा भरण्यासंदर्भात पत्र दिले होते.
सगळ्या राज्यांचा आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशात वर्ग ए दोन आणि तीन देखील आपण एमपीएससीला दिलेलं आहे. त्यातूनच, आपण एमपीएससीचं रिस्ट्रक्चरिंग करत आहोत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, अशात आपण त्यांच्यासोबत बोलणी करुन, त्यांचं ऐकून काही गोष्टी करतोय, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
आमदार विक्रम काळे यांचा प्रश्न
MPSC मध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकिया होऊनही उमेदवारांचे पोस्टिंग होत नाही. याशिवाय पोस्टिंग देण्यासाठी काही व्यवहार होतात, असा आरोपच आमदार विक्रम काळे यांनी केला आहे. त्यावरही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं.
भविष्यात मोठी भरती
एमपीएससीची सर्वच पदं लवकर भरली गेली पाहिजे हा प्रयत्न असतो. सध्या तीन पदे रिक्त आहेत, ती आपण तात्काळ भरतोय. पूर्ण रिस्ट्रकचर करत आहोत. भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तसेच, परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केलं, तरी देखील मी मान्य करतो की अजुन वेगाने काम करू, असेही फडणवीस यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=3l_tyjlrxro
मराठीच होणार MPSC परीक्षा
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगत अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्याने या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात .पण आता लोकसेवा आयोगातील अभियांत्रिकी पदांसाठी होणाऱ्या परीक्षा मराठीत होणार आहेत .अभियांत्रिकी पदांच्या अभ्यासक्रमांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होणार असून इतर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा ही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले .
अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.