चौघांचा होरपळून मृत्यू! आगीत भस्मसात झालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सची तपासणी; आरटीओच्या अधिकाऱ्यांन
पुणे: हिंजवडी फेज वन परिसरामध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन कंपनीकडे जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 8 वाजता घडली आहे. या घटनेमध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघेही कर्मचारी होते. सकाळी त्यांना घेऊन टेम्पो ट्रॅव्हल्स ऑफीसला निघाली होती. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर आयटीयन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्युमो ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं मेंटेनन्स झालं नव्हतं का? या प्रश्नांचा उत्तर पोलीस शोधत आहेत. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आणि वायरिंग या ठिकाणी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. हिंजवडीमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणणाऱ्या ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर आगीचं कारण शॉर्टसर्किट असू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर हिंजवडीमध्ये वाहतूक करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन असेही आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण म्हणाले, गाडी पुर्णपणे जळालेली आहे. गाडीची आम्ही प्रथमदर्शनी पाहणी केली त्यानुसार,शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आधीत तपास सुरू आहे. या घटनेत जळालेलं वाहनाचं प्रमाणपत्र वैध आहे. त्याचबरोबर गाडीचा सर्व कर भरला आहे. कंपनीचे कर्मचारी यांची ने-आण करण्यासाठी हे वाहन वापरलं जात होतं. त्यानंतर आता सर्व बस संघटनांसोबत एक बैठक घेऊन वाहनांमध्ये काय सोईसुविधा असाव्यात, त्याचबरोबर आग लागली तर काय करावं, अपघात झालं तर काय करावं हे सांगण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व तपासण्या वेळोवेळी करणे, कर भरणे या सर्व गोष्टी तपासल्या पाहिजेत असंही संदेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोतून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचले. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्याने चार कर्मचारी आगीत होरपळले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आग – मृतक आणि जखमींची नावं
-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40,
सर्व राहणार पुणे
जखमी झालेल्यांची नावे
-प्रदीप राऊत
-प्रवीण निकम
-चंद्रकांत मलजीत
-संदीप शिंडे
-विश्वनाथ झोरी
– जनार्डन हंबरडकर – टेम्पो ड्रायव्हर
अधिक पाहा..
Comments are closed.